शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता : धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:06 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या ...

ठळक मुद्देघरे रिकामी करण्याचे आवाहन

नाशिक : महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे काम सुरू झाले आहे. नाशिक शहरात दर पावसाळ्यात धोकादायक घरांचा प्रश्न उभा राहातो. पावसाळ्यात नाशिक आणि पंचवटी गावठाणातील जुने वाडे भिजतात आणि त्यानंतर काही वाड्यांचा भाग कोसळतो तर काही वेळा संपूर्ण वाडेच खाली येतात. गेल्या वर्षी सुमारे पंचवीस ते तीस वाडे पडले होते आणि त्यात दोन जणांचे बळी गेले होते तर एक दोन ठिंकाणी वाडे पडल्याने संबंधीत वाड्यातील नागरीक जखमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने संबधीतांना घरे रिकामी करून अन्यत्र स्थलांतरासाठी नोटिसा बजावून पोलीसांची देखील मदत घेतली होती. घर मालक आणि भाडे करू वादात अनेक धोकादायक वाड्यांचा पुनर्विकास होऊ शकला नाही. याठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याची तयारी असली तरीअद्याप ती प्रशासकिय लालफितीत आहेत. गेल्या वर्षी हा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी यंदा लॉक डाऊनमुळे महापालिकेचा अघात मुल्यमापन अहवाल रखडला आहे. यासंदर्भात, गेल्या आठवड्यात 'लोकमत'ने क्लस्टर वा-यावर वाडे पडण्यावर हे वृत्त देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.दरम्यान आता प्रशासनाने धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यानुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे आढळून आले आहेत. त्यातील निम्या मिळकती अती धोकादायक आहेत. या सर्वांना नोटिसा बजावण्यासाठी नगररचना विभागाने ७०८ नोटिसा तयार करून विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविल्या असून त्या संबंधीतांना बजवण्यास प्रारंभ झाला आहे. तथापि, यानंतर देखील नागरीक स्थलांतरीत होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस