शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

स्थायी समिती जात्यात, प्रशासन सुपात!

By admin | Updated: July 23, 2015 00:28 IST

साधुग्राम स्वच्छतेचा ठेका : स्थायीसमोर पेच

 

नाशिक : साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याबाबत उच्च न्यायालयाने उचित निर्णयासाठी स्थायी समितीच्याच कोर्टात चेंडू टोलविल्याने समितीपुढे आता पेच निर्माण झाला असून कोणत्याही परिस्थितीत वादग्रस्त ठेकेदाराला ठेका मिळू नये, या भूमिकेवर काही सदस्य ठाम आहेत. प्रशासनाकडून आता फेरप्रस्ताव कोणत्या स्वरूपात पाठविला जातो यावर ठेक्यास मंजुरी अवलंबून असली तरी ‘जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात’ याचा प्रत्यय यानिमित्ताने स्थायीला आला आहे. याशिवाय प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवरही महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. साधुग्राम स्वच्छतेचा ठेका वादग्रस्त वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीला देण्यास स्थायी समितीने विरोध दर्शवितानाच त्याच दरात काम करणाऱ्या द्वितीय निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीला काम देण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. स्थायीच्या या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने स्थायीने दिलेल्या आदेशाला स्थगिती देतानाच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तातडीची गरज लक्षात घेता उचित निर्णय घेण्याची मुभा स्थायीला दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता स्थायीच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत वादग्रस्त ठेकेदाराला काम न देण्याबाबत स्थायीने घेतलेल्या भूमिकेत बदल होणार नसल्याचे स्थायीचे सदस्य प्रा. कुणाल वाघ, यशवंत निकुळे यांनी स्पष्ट केले असून प्रशासनाकडून नेमका काय फेरप्रस्ताव येतो, यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाकडून पूर्वीचाच प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायीवर मंजुरीसाठी पाठविला जाऊन स्थायीला खिंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अगोदरच न्यायालयीन प्रक्रियेमुळे २२ दिवस निघून गेले आहेत. त्यामुळे स्थायीने शॉर्ट टेंडर प्रक्रिया राबविली तरी त्यात आणखी १० ते १५ दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यातच साधुग्राममध्ये आता मोठ्या प्रमाणावर साधू-महंत दाखल होऊ लागल्याने साफसफाईअभावी स्वच्छतेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अंतिम निर्णय घेण्याबाबत स्थायी समितीपुढे पेच निर्माण झाला आहे. स्थायी समितीची अवस्था ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी झाली आहे. (प्रतिनिधी)