शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

नाशकात अस्वच्छतेचे आगर बनलेल्या खासगी मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे स्थायी समितीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 14:39 IST

स्थायी समितीत चर्चा : दंडात्मक कारवाई करण्याची सभापतींची सूचना

ठळक मुद्देशहरात खासगी मालकीचे असंख्य मोकळे भूखंड विकासाविना पडूनमोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर गवत वाढून डासांच्या उत्पत्तीला पोषक स्थिती

नाशिक : शहरात खासगी मालकीचे मोकळे भूखंड हे अस्वच्छतेचे आगर बनत चालल्याने महापालिकेच्या स्थायी समिती सभेत त्यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी, शहरातील अस्वच्छता निर्माण करणा-या खासगी मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले.स्थायी समितीच्या सभेत विशाल संगमनेरे यांनी पुन्हा एकदा खासगी मोकळ्या भूखंडांवर होणा-या अस्वच्छतेकडे लक्ष वेधले. शहरात खासगी मालकीचे असंख्य मोकळे भूखंड विकासाविना पडून असून, त्यांचा वापर सध्या कचराकुंड्या म्हणून होत आहे. मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर गवत वाढून डासांच्या उत्पत्तीला पोषक स्थिती निर्माण होत आहे. खासगी भूखंड मालकांकडूनही भूखंडांच्या साफसफाईकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अशा भूखंड मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबत गांभीर्याने घेत अशा मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. सर्वेक्षणानंतर संबंधिताना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाईच्याही सूचना देण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी खासगी शाळांकडून पार्किंगची व्यवस्था होत नसल्याने रस्त्यावरच वाहने लावून दिली जात असल्याची तक्रार केली. संबंधित शाळांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली. त्यावर शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दोन महिन्यांपासून याबाबत अ‍ॅक्शन प्लॅन तयार असल्याचे स्पष्ट करत शाळांना त्यांच्या पार्किंगमध्येच वाहने लावण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगितले. गंगापूररोडवरील एका शाळेवर कारवाई केल्याचीही उपासनी यांनी माहिती दिली. दरम्यान, उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी मालमत्ता सर्वेक्षणाची माहिती दिली. मालमत्ता सर्वेक्षणात ५८ हजार मिळकती नव्याने आढळून आल्या असून, त्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पूर्वीच संबंधिताना कर आकारणी केली जाणार आहे. त्यातून वार्षिक १० ते १२ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षाही दोरकुळकर यांनी व्यक्त केली. मुख्य लेखापाल सुभाष भोर यांनी जानेवारी महिन्यातच सन २०१८-१९ चे अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.सुधारित प्राकलनास मान्यतापिंपळगाव खांब येथे केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत ३२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येणार असून, सदर कामासंदर्भात सुधारित दरसूचीनुसार निविदा रकमेत झालेल्या वाढीस स्थायी समितीने मंजुरी दिली. सदरचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. ठेकेदाराने मुदतीअगोदर काम केल्यास त्यास इन्सेंटीव्ह देण्यासही मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका