निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाºया महिला आरोग्य कर्मचाºयांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्टोल भेट देण्यात आले.आमदार दिलीप बनकर यांच्या कल्पनेतून निफाड तालुक्यात भिलवाडा पॅटर्न राबविला जात आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केला जात आहे.या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मदतनीस आशा वर्कर, आरोग्यसेवक, सहाय्यक यांना स्टोलची भेट देण्यात आली.आमदार दिलीप बनकर, बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांच्याकडे स्टोल सुपुर्द केले.याप्रसंगी माजी सभापती सुभाष कराड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, इरफान सय्यद, नगरसेवक दिलीप कापसे, बंटी शिंदे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
सर्वेक्षण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्टोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:02 IST