शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

पर्यटनाचे रुतलेले अर्थचक्र होणार पुन्हा गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:47 IST

नाशिक : मागील सहा महिन्यांपान राज्यासह देशात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे. हा थैमान रोखता यावा यासाठी दरम्यानच्या काळात राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊनही घोषित केले. यामुळे पर्यटन व्यवसायाचेही अर्थचक्र पूर्णपणे रुतले; मात्र राज्य सरकारने पुन्हा 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत विविध पर्यटनस्थळाभोवतालची लहान हॉटेल्स, रिसॉटर्पासून घरगुती निवास-न्याहारी केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे थबकलेल्या पर्यटनाला गती मिळण्यास मदत होऊन देशाटनाचा पुनश्च हरिओम होईल, असा आशावाद पर्यटनदिनी व्यक्त होत आहे.

नाशिक : मागील सहा महिन्यांपान राज्यासह देशात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे. हा थैमान रोखता यावा यासाठी दरम्यानच्या काळात राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊनही घोषित केले. यामुळे पर्यटन व्यवसायाचेही अर्थचक्र पूर्णपणे रुतले; मात्र राज्य सरकारने पुन्हा 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत विविध पर्यटनस्थळाभोवतालची लहान हॉटेल्स, रिसॉटर्पासून घरगुती निवास-न्याहारी केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे थबकलेल्या पर्यटनाला गती मिळण्यास मदत होऊन देशाटनाचा पुनश्च हरिओम होईल, असा आशावाद पर्यटनदिनी व्यक्त होत आहे.कोरोना हा संसर्गजन्य आजार आला आणि संपूर्ण मानवी जनजीवन दहशतीच्या छायेत सापडले. सुरूवातीला शहरी भागात हा आजार फोफावला आणि हळूहळू या आजाराने ग्रामीण भाग देखील व्यापला. यामुळे घरी-दारी पाहुण्यांचे स्वागत पूर्णपणे थांबले. लोकांच्या घरी पाहुणे येणे बंद झाले आणि पर्यटनाच्यानिमित्ताने ग्रामीण भागातील विविध तालुक्यांच्या ठिकाणी पर्यटनस्थळांवर हजेरी लावणा?्या पाहुण्यांनाही प्रवेश 'बंद' करण्यात आला. कोरोना आजाराची भीती यामागे दिसून आली. कोरोना आजारापासून आपले घर, गाव, पाडा, वस्ती कशी सुरक्षित ठेवता येईल यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु झाले आणि ते तितकेच गरजेचेही होते. मागील पाच महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील पर्यटन पूर्णत: बंद पडले होते. राज्य सरकारकडून अनलॉक, मिशन बिगीन अगेन ची घोषणा झाल्यानंतर लॉकडाऊनकाळात आलेला क्षीण घालविण्यासाठी पर्यटकांची पावले हळूहळू निसर्गरम्य भागाकडे वळू लागली. एकदिवसीय वर्षासहलीचे बेत विकेंडला आखले जाऊ लागले. पावसामुळे ग्रामीण भागातील बहरलेले निसगर्सौंदर्य प्रत्येकालाच खुणावत आहे. सहयाद्रीच्या हिरव्यागार पर्वतरंगांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे बघण्यासाठी पर्यटक (मास्क लावून) घराबाहेर पडले.इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या निसर्ग पर्यटनाची भुरळनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली, वैतरणा, कावनई, घाटनदेवी-मोखाडा रोड, त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी,पेगलवाडी पाहिने-घोटी रस्ता, हरसूल-वाघेरा रस्ता, दुगारवाडी, गंगापूर धरण परिसरात पर्यटक नजरेस पडू लागले. दरम्यान, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना नागरिकांना निवास-भोजनाच्या सुविधांवर पाणी सोडावे लागले कारण त्यावेळी सर्वच हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट कुलूपबंद होते.अलीकडेच शासनाने पर्यटनाचा 'पुनश्च हरिओम' करताना काही अटी-शर्ती ठेवत निवासी सुविधांवरील निर्बंध हटविले आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रीसॉर्टस्, होम-स्टेबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे....अशी आहे पर्यटनाची 'एसओपी'केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदशिर्केनुसार पर्यटनाची 'एसओपी' तयार करण्यात आली आहे.मिशन बिगीन अगेनअंतर्गत शासनाने निवासी सुविधा पर्यटकांना उपलब्ध व्हावी आणि गैरसोय टाळली जावी तसेच अर्थचक्राला गती यावी या उद्देशाने हॉटेल, लॉज, रिसॉर्टस, एमटीडीसी मान्यता असलेली निवास न्याहारी केंद्रे आदी शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र करताना कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही यासोबत सरकारने केल्या आहेत.हॉटेल्स आणि रिसॉर्टसमध्ये येणा?्या प्रत्येक पर्यटकाची प्रवेशद्वारावर थर्मल गन, आॅक्सिमीटर द्वारे तपासणी करावी. सर्दी, ताप, खोकल्याची कुठलीही लक्षणे नसलेल्या पर्यटकांना प्रवेश द्यावा.सेवा देताना तसेच वेटींग रुम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक, बैठक व्यवस्था सुद्धा तशीच असावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधीत पपर्यटकाची ची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधीताची नाहरकत घेण्यात यावी. पपर्यटकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर उपलब्ध करुन दिला जावा. डिजीटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे.हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणा?्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी असलेली वाहने प्रत्येकवेळी निर्जंतुक केली जावी. पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो आॅनलाईन भरुन घ्यावा.काय करावे आणि काय करु नये (डूज आणि डोन्टस्) संदर्भातील माहिती पर्यटकांना बूकलेट, माहिती फलक किंवा व्हीडीओच्या स्वरुपात देण्यात यावी.पर्यटकांनी त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी. रुम सर्व्हीस संपर्करहीत असावी. मागवलेली आॅर्डर रुमच्या बाहेर सुरक्षित ठेवावीङ्घलहान मुलांसाठीचे प्ले एरिया, उद्याने, तसेच स्वीमिंग पूल बंद राहतील.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या