शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

संत निरंकारी समागमसाठी घोटीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:17 IST

नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यंत रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देघोटी शाखा : बोरगड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सर्वतीर्थ टाकेद : नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यंत रॅली काढून जनजागृती करण्यात आली.रॅलीत गावोगावच्या संत व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यापूर्वी मुंबई येथे संत समागम होत असे. परंतु दिवसेंदिवस लाखोंची गर्दी वाढत चालल्याने चुनाभट्टी (चेंबूर), कळवा (ठाणे), खारघर (नवी मुंबई) येथील जागा कमी पडल्याने हा कार्यक्रम नाशिक येथे घेण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी, इगतपुरी व शिरेवाडी या तीन शाखांपैकी घोटी शाखेतील मोगरेचे प्रबंधक दत्तू नाडेकर, खडकवाडीचे गुलाब कडू, घोटीचे शिवाजी बारगजे, सोमजचे कृष्णा कुंदे, गरुडेश्वरचे तानाजी वारघडे, वैतरणाचे वाळू पारधी, गांगडवाडीचे सोनू गांगड, उभाडेवाडीचे गोरख गांगड, उभाडेचे किसन उंबरे, उंबरकोणचे सुकदेव सारूक्ते, बळवंतवाडीचे लक्ष्मण लोटे, भरवजचे शशिकांत मेमाणे, दरेवाडीचे बाळू गावंडा, काळुस्तेचे शिवराम घारे, खैरगावचे सोमनाथ फोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलीप तोकडे, माजी उपसरपंच संतोष दगडे, राजू लंगडे, गजानन दुरगुड, ज्ञानेश्वर कडू व शिवमल्हार मित्रमंडळ यांच्या सहकार्याने रॅली काढण्यात आली. पारंपरिक पोशाख परिधान केलेले बालसंत न्यू इंग्लिश स्कूल काळुस्तेचे लेजीम पथक लक्षवेधी ठरले. यावेळी सुधाकर दुरगुडे, पंडित डहाळे, राम भटाटे, दशरथ उंबरे उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम