शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मालेगावी आमदारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 1:45 AM

मालेगाव शहरातील रॉकेल परवानाधारकांना धान्य वितरण कार्यालयाकडून वेठीस धरले जात असल्याबद्दल जाब विचारत मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी धान्य वितरण अधिकारी नरेश बहिरम यांना चांगलेच फैलावर घेतले.

ठळक मुद्देधान्य वितरण अधिकाऱ्यास घेतले फैलावर

मालेगाव मध्य : शहरातील रॉकेल परवानाधारकांना धान्य वितरण कार्यालयाकडून वेठीस धरले जात असल्याबद्दल जाब विचारत मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी धान्य वितरण अधिकारी नरेश बहिरम यांना चांगलेच फैलावर घेतले.दरम्यान, आमदार शेख यांनी जाब विचारल्याचे ध्वनिमुद्रीत करून केल्याच्या निषेधार्थ व प्रलंबित मागण्यांसाठी आमदार शेख यांनी प्रांत कार्यालयाबाहेर अडीच तास ठिय्या दिला. मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.शहरातील रॉकेल परवानाधारकांना शिधा पत्रिकाधारकांचे आधारकार्डची छायांकित प्रत व घोषणापत्र मागविण्यात आले होते. त्यानुसार आज दुपारी रॉकेल परवानाधारकांनी आधारकार्ड व घोषणापत्राचे गठ्ठे जमा करण्यासाठी धान्य वितरण कार्यालयात आणले होते; मात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांचे रहिवासी पुरावे सोबत जोडण्यात यावे यासह काही त्रुटी काढत सदर कार्यालयाकडून त्यांना परत पाठविण्यात आले. याची माहिती आमदार आसीफ शेख यांना मिळताच त्यांनी धान्य वितरण कार्यालयगाठले.धान्य वितरण अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत जाब विचारला. अर्धालिटर घासलेटसाठी लाभार्थीने किती वेळा आधारकार्ड द्यावे. लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पुरवठा विभागाची असून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणे थांबवावे, असेही त्यांनी सुनावले. शेख यांनी काही स्वस्त धान्य दुकानांची माहिती मागितली होती. त्यास २५ दिवस उलटूनही आमदारांना माहिती मिळालेली नाही तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल केलादरम्यान, धान्य वितरण अधिकारी बहिरम यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी संचात सर्व संभाषण ध्वनिमुद्रीत करीत असल्याचे कार्यकर्त्याने शेख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरून शेख यांचा संताप अनावर झाला. त्यांनी परवानाधारकांना घेत प्रांत कार्यालय गाठून कार्यालयाबाहेर कागदपत्रांचे गठ्ठे ठेवत मागण्यांसाठी ठिय्या दिला.यावर प्रांत विजयानंद शर्मा यांनी शेख यांची समजूत काढली. त्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन धान्य वितरण कार्यालयाकडून देण्यात आल्याने शेख यांनी सायंकाळी दिलेला ठिय्या आंदोलन मागे घेतले.इष्टांकात वाढ करावीशहरातील केसरी शिधापत्रिकाधारकांना मागील चार वर्षांपासून धान्य मिळत नाही म्हणून मालेगाव शहरासाठी राष्टÑीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्वांना धान्य मिळणेकामी शहराचा इष्टांकात वाढ करण्यात यावी. शहरातील रॉकेलसाठी पात्र लाभार्थींचे कार्यालयीन यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात यावे. तोपर्यंत रॉकेलचा कोटा सद्यस्थितीत ठेवावे. पाच स्वस्त धान्य दुकानांबाबत मागण्यात आलेली माहिती त्वरित देण्यात यावी.

 

टॅग्स :MalegaonमालेगांवAsif Shaikhआसिफ शेख