शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:45 IST

गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. रूंद रस्त्यासाठी जागा देण्यास सुमारे २८०० प्रस्ताव नगररचना विभागात सादर झाले

नाशिक : गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. रूंद रस्त्यासाठी जागा देण्यास सुमारे २८०० प्रस्ताव नगररचना विभागात सादर झाले असून, त्यामुळेच आता पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.सदनिका बांधताना त्यातील कपाटासाठी असलेली जागा मूळ सदनिकेत समाविष्ट करून मुक्त चटई क्षेत्राचा पूर्णत: वापर करण्याचे प्रकार नाशिक शहरात घडले असून, हजारो प्रकरणे पूर्णत्वाच्या दाखल्याविना अडकली आहेत. वाढीव चटई क्षेत्राशिवाय कपाट प्रकरणे नियमित होत नसल्याने त्याबाबत बांधकाम व्यावसायिकांनी राज्य शासनाकडे अनेकदा चकरा घातल्या; परंतु उपयोग झाला नव्हता; मात्र त्यानंतर आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून कलम २१० अन्वये शहरातील सर्व सहा व साडेसात मीटर रूंदीचे रस्ते किमान नऊ मीटर करण्याची योजना आखली. अशा रस्त्यांसाठी दोन्ही बाजूच्या मिळकतदारांकडून समसमान जागा घेऊन त्या बदल्यात त्यांना वाढीव चटई क्षेत्र देण्याची योजना आहे, त्यामुळे कपाट प्रकरणे नियमित होऊ शकतात असे सांगितले जाते.गेल्यावर्षी आयुक्तांनी यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी २८०० नागरिकांनी प्रस्ताव दिले असून, आपल्या मिळकती घेऊन नऊ मीटर रूंदीचा रस्ता करण्यास संमती दिली आहे. तलाठ्याकडे जाऊन आणि रस्त्याच्या क्षेत्रावर महापालिकेचे नाव लावून त्याची कागदपत्रे महापािलकेत जमा करण्यात आली आहेत, त्या आधारे आता नगररचना विभाग छाननी करणार असून, नियमात बसणाऱ्या मिळकतधारकांना वाढीव चटई क्षेत्र देण्यात येणार असल्याने कपाटकोंडी फुटू शकेल.संबंध नसणाऱ्यांना फटकाकपाटकोंडी फोडण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकाराचा वापर केल्याने आता सर्वच रस्ते किमान नऊ मीटर रूंद होणार आहेत. तथापि, कपाटकोंडीचा संबंध नसलेल्या प्लॉट धारकांना गरज नसताना नऊ मीटर रस्ता रूंद करण्यासाठी सतीने जागा घेण्यात आली. ज्यांच्या इमारती बांधून केवळ पूर्णत्वाचा दाखला घेणे बाकी होते त्यांनाही नियमाचा फटका बसला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक