शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या सवलती नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:40 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ प्रकारच्या विशेष प्रवासी सवलती दिल्या जातात. परंतु या सवलतींची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वगळता अन्य सवलती केवळ कागदावरच आहेत.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ प्रकारच्या विशेष प्रवासी सवलती दिल्या जातात. परंतु या सवलतींची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वगळता अन्य सवलती केवळ कागदावरच आहेत.  राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर योजना, विद्यार्थी मासिक पास, विद्यार्थ्यांना सुटीत गावी जाण्यासाठी, परीक्षेला जाण्यासाठी, शालेय कॅम्पला जाण्यासाठी, आजारी आई-वडिलांना भेटण्यास जाण्यासाठीची सवलत योजना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी ५० टक्के नैमित्तिक करार सवलत, रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता सवलत, दलितमित्र पुरस्कारप्राप्त व्यक्ती, अंध अपंग व्यक्ती, अंध-अपंग व्यक्ती व त्यांचे साथीदार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारार्थी, क्षयरोगी उपचारासाठी ५० टक्के प्रवासी सवलत, कर्करोगी असल्यास उपचारासाठी जाण्यासाठी प्रवास सवलत, कुष्ठरोगी उपचाराला जाण्यासाठीची मदत, अधिस्वीकृती पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्ती, राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, अर्जुन-दादाजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नागरिक, आषाढी एकादशीला प्रथम पूजेचा मान असलेले दाम्पत्य, माजी विधिमंडळ सदस्य, विद्यमान विधिमंडळ सदस्य, अपंग गुणवंत कामगार अशा घटकांना मोफत, ५० तसेच ७५ टक्केपर्यंत भाड्यात सवलत देण्याची महामंडळाची योजना आहे.सवलतींची माहितीच नाहीयातील असे काही घटक आहेत की जे अशा सवलतींचा लाभ घेतच नाही किंवा अभावानेच लाभ घेतात. त्यामध्ये विधिमंडळाचे प्रतिनिधी, खेळाडू, कर्करोगी, क्षयरोगी, गावी जाणारे विद्यार्थी, पत्रकार यांचा समावेश आहे असून त्यांचे लाभाचे प्रमाण १५ ते २५ टक्क्याच्या जवळपास आहे.

टॅग्स :Nashikनाशिक