शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगी गडावरील तीव्र चढावर एसटी बसने तोडला दम; ब्रेक न लागल्याने दोन वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 18:19 IST

सदर बसचे ब्रेक न लागल्याने अन्य दोन वाहनांचे नुकसान झाले.

नाशिक : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर शुक्रवारी (दि. ९) राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुन्हा एकदा प्रवाशांचा जीव टांगणीला लावला होता. गडावरील धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळील तीव्र चढावर सिन्नर आगाराच्या बसने दम तोडल्याने बसमधील ९० प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता; परंतु चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. 

सदर बसचे ब्रेक न लागल्याने अन्य दोन वाहनांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर शुक्रवार हा देवीचा वार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (क्रमांक एमएच- २०, बीएल- ३५७८) नाशिकहून सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी निघाली होती. गडावरील धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळ बस आली असता, रस्त्याला तीव्र चढ असल्याने बस पुढे न जाता मागे येऊ लागली. 

यावेळी बाका प्रसंग उभा राहिला. या बसमध्ये सुमारे ९० प्रवासी होते. जुनी बस असल्याने; तसेच बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्याने गाडीचे ब्रेक लागले नाहीत. यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या डाव्या बाजूला बस सरकत नेली व कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन थांबविली. या घटनेने बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. बस थांबताक्षणीच प्रवासी जिवाच्या भीतीने पटापट गाडीच्या खाली उतरले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

चालक चक्क ब्रेकवरच उभा राहिला शुक्रवार हा देवीचा वार असल्याने गडावर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी वाहने पार्क केली होती. ब्रेक न लागल्याने मागील बाजूने एसटीने दोन वाहनांना धडक दिल्याने त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या खासगी वाहनांत चालक झोपलेले होते. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. चालकाने चक्क ब्रेकवर उभे राहून बस थांबविण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :state transportएसटी