शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीधर फडके यांच्या स्वरांनी नाशिककर रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:49 IST

अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले.

नाशिक : अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले.गोविंदनगर येथे संस्कृती वैभवतर्फे सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या त्रिवेणी महोत्सवाच्या दुसºया दिवशी शनिवारी (दि.२२) गीतरामायणाच्या सादरीकरणातून कला क्षेत्रातील या त्रयींना मानवंदना देण्यात आली. यावेळी श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती, लव-कुश रामायण गाती’ या गीतापासून सुरू झालेला स्वरयज्ञ उत्तरोत्तर रंगत गेला. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रत्येक गाण्याला दाद दिली.  यावेळी श्रीधर फडके यांच्यासह निवेदिका सुकन्या जोशी यांनी प्रत्येक गाण्याच्या निर्मितीमागच्या आठवणींना उजाळा देताना गदिमा आणि सुधीर फडके यांच्यात झालेल्या संवादाचे विविध किस्सेही रसिकांसमोर उलगडून सांगतानाच ‘दशरथा हे घे पायस दान’, ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’, ‘आज मी शापमुक्त जाहले’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आदी गीतांमधून रामायनातील विविध प्रसंग श्रीधर फडके यांनी रसिकांसमोर उभे केले. त्यांना तबल्यावर तुषार आग्रे, किबोर्डवर अतुल माळी, बासरीच्या सुरांसह सचिन जगताप यांच्यासह व्यंकटेश कुलकर्णी, प्रदीप शेंगाळे, वंदना सहस्त्रबुद्धे, अमृता धारप यांनी साथसंगत केली.साठवणीतील आठवणींना मिळणार उजाळात्रिवेणी महोत्सवात रविवारी (दि.२३) संस्कृती वैभव पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (मुंबई), ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्र्रात्रे (नाशिक) यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘आठवण एक साठवण’ कार्यक्रमातून राजदत्त यांच्यासह अभिनेत्री आशालता वाबगावकर, अशोक पत्की व संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी मुलाखतकार सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक