शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्ण , श्रीदत्त मंदिरांमध्ये  ‘गोविंद’च्या गजरात पविते अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:23 IST

राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. महानुभाव पंथातदेखील परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो.

नाशिक : राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. महानुभाव पंथातदेखील परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो. शहरातील विविध श्रीकृष्ण व श्रीदत्त मंदिरांमध्ये पविते अर्पण करण्याचा सोहळा ‘गोविंद’च्या गजरात संपन्न झाला.  परमेश्वरबरोबर गुरूलादेखील पविते अर्पण करण्यात येते. यासाठी महानुभाव पंथीय श्रीकृष्ण व  श्रीदत्त मंदिरात उत्साहाचे वातावरण असून, आकर्षक सजावट करण्यात येत आहे.  नारळी पौर्णिमेच्या सणाला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात पविते पर्व हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान श्रीकृष्ण तथा पंचावतारांना सूताने गुंफलेल्या नारळाचे पाविते अपर्ण करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत हा उत्सव तथा विधी सुरू असतो. यानिमित्त नारळी पौर्णिमेपासून ते जन्माष्टमीपर्यंत मंदिरात आणि आश्रमात आकर्षक सजावट करण्यात येते. तसेच उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. घरोघरीही देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते.  नाशिक जिल्ह्यात महानुभाव पंथाची अनेक तीर्थस्थाने असून, यात कसबे सुकेणे तथा सुकदाणी बाबा आणि सिन्नर या तीर्थक्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे.  याठिकाणी चतुर्दशीला नारळी पौर्णिमेला देवाला पविते अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते तसेच नाशिक शहरात मोरवाडी येथील दत्तमंदिर, श्रीकृष्ण मंदिर, गंगापूर गावातील दत्तमंदिर, आडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरातदेखील पविते पर्वविधी साजरा करण्यात आला. सर्वच मंदिरांत आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नारळी पौर्णिमेला भाविकांनी देवाला तसेच गुरूंना गोविंदाच्या गजरात पविते अर्पण केले.पर्वताची गुंफणनारळी पौर्णिमा तसेच चावदस यादिवशी श्रीकृष्ण मूर्ती आणि संत-महंत यांना पविते अर्पण करण्याची प्रथा आहे. श्रीफळ हे मांगल्याचे प्रतीक असून, त्याभोवतीचा सुताचा धागा हा आदर आणि प्रेमाचा भाव व्यक्त करण्यासाठी गुंफला जातो. नारळाला सुताच्या धाग्याने गुंफून त्यांच्या दोन्ही टोकाला दोन सुपाऱ्या बांधण्यात येतात. गोविंद-गोविंच्या गजरात हा विधी पार पडतो.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक