शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, जुने नाशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:09 IST

जुने नाशिक परिसरातील संत नामदेव पथवर असलेल्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिराचा इतिहास पाहता किमान १५० वर्षे मागे जावे लागेल. १९व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराची देखभाल नामदेव शिंपी समाजाकडे होती.

शहरातील विठ्ठल मंदिरेनाशिक : जुने नाशिक परिसरातील संत नामदेव पथवर असलेल्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिराचा इतिहास पाहता किमान १५० वर्षे मागे जावे लागेल. १९व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराची देखभाल नामदेव शिंपी समाजाकडे होती.सुरुवातीस मंदिरात विठ्ठल-रु क्मिणीच्या छोट्या मूर्ती होत्या. कालांतराने रुक्मिणीमातेची मूर्ती भंग पावल्यानंतर आता ज्या आहेत, त्या काळ्या पाषाणाच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली गेली. कालानुरूप मंदिरात बरेच बदल करण्यात आले. नामदेव महाराजांची नंतर ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या मूर्र्तींचीही स्थापना करण्यात आली.मंदिरात रोज काकड आरती, महिला मंडळाचा हरिपाठ, दर एकादशीला तसेच रामनवमी, कृष्णजन्म, संतांचे समाधी सोहळे अशाप्रसंगी नामदेव महाराज भजनी मंडळाचे संगीत भजन असते. आषाढी व कार्तिकी एकादशीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते ‘श्रीं’ची महाआरती केली जाते. तसेच मंदिराचे बांधकाम झाल्यापासून नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.या मंदिरात जोग महाराज, लक्ष्मण महाराज, बंकटस्वामी, सोनोपंत दांडेकर (मामा), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी संत, महात्म्यांनी या मंदिरात कीर्तन, प्रवचन आदी भगवतसेवा केली आहे. संत गाडगे महाराजांचे वास्तव्य आणि कीर्तनसेवा येथे झाली आहे. बंकटस्वामी हे मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूच्या खांबाला टेकून गीतापाठ, चिंतन करत अशाही आठवणी काही वृद्ध भाविक सांगतात. त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची दिंडी जी आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघते, ती सुरू झाल्यापासून तिचा दुसरा मुक्काम याच मंदिरात असतो. सदर परंपरा सव्वाशे ते दीडशे वर्षांची आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीTempleमंदिर