शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्रीपंच दशमान जुना आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा

By admin | Updated: May 29, 2015 00:05 IST

त्र्यंबकेश्वर : शहरातून साधू-महंतांची मिरवणूक

त्र्यंबकेश्वर : येथील दहा आखाड्यांपैकी श्रीपंच दशनाम जुना आखाडा गुरुगादी रमता पंच आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा गुरुवारी पार पडला.त्र्यंबकेश्वर शहरातर्फे त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष अलका शिरसाट यांच्या हस्ते शंकराचार्य जगदगुरु अनन्त श्रीविभूषित स्वामी नरेद्रचंद्र सरस्वती महाराज उर्ध्वानाथ, श्रीक्षेत्र काशी सुमेरु पीठाधीश्वर श्रीशंकरानंद महाराज महामंडलेश्वर माटुंगा-मुंबई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो साधू-महंत, भक्तगण, आखाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशहरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुना आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा रात्री ८.१५ च्या सुमारास पार पडला. हा आखाड्याच्या पिंपळद येथील आश्रमातून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत पाटी मिरवणुकीने शहरात आगमन झाले. या मिरवणुकीत आखाड्याच्या इष्टदेवता, भाल्यांच्या स्वरूपात होत्या. आखाड्याची इष्टदेवता गुरुदत्तात्रय, तसेच ध्वजा रात्री सामुग्री घेऊन महात्मा-साधु चालत होते. चातुर्मास सुरु होण्यापूर्वी आज नगरप्रवेश करण्यात आला. या अखाड्याच्या संबंधीत शंकराचार्य चातुर्मासात गोदावरी ओलांडीत नाही. त्यामुळे चातुर्मासापूर्वीच शहरात प्रवेश करून घेतला. गंगा दशहाराच्या दिवशी अखाड्याच्या प्रमुखांची शहर प्रवेश करण्याची इच्छा होती.पिंपळदपासून निवांत जागी हा आश्रम असून अखाड्याच्या मालकीची सुमारे ४० ते ५० एकर जमीन आहे. त्या ठीकाणापासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंत अंब७री रस्ता, फिल्टर प्लॅन्टपासून स्वतंत्र पाईपलाईन, पाण्याची टाकी अशा सुविधा शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. या ठिकाणापासून आजची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्रीमहंत हरीगिरीजी महाराज, श्रीमहंत प्रेमगिरीजी महाराज, श्रीमहंत भागवतश्रीजी (अध्यक्ष) महाराज, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सोहनागरी महाराज, श्रीमहंत उमाशंकरभारती, श्रीमहंत विद्यानंद सरस्वती, देवानंद सरस्वती हरिद्वार, परशरामगिरी, नारायणगिरी, कमलपुरी, श्रीमहंत इंद्रपुरी महाराज, मोहन भारती, अशोकगिरीजी, धनराजगिरी, हिरापुरी, इंद्रानंद सरस्वती आदी मिरवणुकीत सामील झाले होते. त्र्यंबकेश्वर मंदीर, कुशावर्त तिर्थाचे दर्शन करून हा सर्व ताफा निल पर्वथावर पोहचला. (वार्ताहर)