विविध मागण्यांसाठी ‘श्रमजीवी’चा इगतपुरीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:38 PM2018-08-06T14:38:36+5:302018-08-06T14:39:01+5:30
घोटी : वाढत्या महागाईमुळे शेतीव्यवसाय तोट्यात जात असल्याने शेती उत्पादन वाढविण्यासाठी मशागतीच्या कामासाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रु पये अनुदान रोजगार हमी योजनेतून देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी इगतपुरी तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
घोटी : वाढत्या महागाईमुळे शेतीव्यवसाय तोट्यात जात असल्याने शेती उत्पादन वाढविण्यासाठी मशागतीच्या कामासाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रु पये अनुदान रोजगार हमी योजनेतून देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी इगतपुरी तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी केले. इगतपुरीतील पंचायत समितीपासून या मोर्चाला सुरु वात झाली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी रोजगार हमी योजना दया अशा घोषणा दिल्या.या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर हा मोर्चा पोलिसांनी अडवला.यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी मधे, शिंदे,संतोष ठोंबरे आदींनी आपल्या मागण्याचे आणि मोर्चाचे उद्दिष्ट सांगितले. यावेळी तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात शांताराम भगत, तानाजी कुंदे, विजय मेंगाळ, रोहिणी चव्हाण, सीताराम गावंडा, बाळू गावंडा लता मेंगाळ यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.