शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

टीईटीसाठी सहाय्यक परिरक्षकांचे बैठे पथक ; परीक्षा साहित्यावर राहणार करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:33 IST

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहाय्यक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून अशा प्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४ व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ परिरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिक्षक पदासाठी नाशिकमध्ये 61 केंद्रावर टीईटी पेपर एकसाठी 34 तर पेपर दोनसाठी 27 केंद्रांवर परीक्षाप्रत्येक केंद्रावर झोनव अधिकारी व सहाय्यक परिरक्षकांची नेमणूक

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून या परीक्षेसाठी  प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहाय्यक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून अशा प्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४  व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ परिरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची प्रशिक्षण सभा व पूर्वतयारी जिल्हा स्तर आढावा बैठक मंगळवारी (दि.१४) मविप्रच्या गंगापूर रोड परिसरातील सीएससीएस महाविद्यालयात घेण्यात आली. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फ त निश्चत क रण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाºया पात्र परीक्षार्थींची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईट जिल्हातील निश्चित केलेल्या ६१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून ३४ केंद्रावंर पेपर एकसाठी  १२ हजार ६७९ तर पेपर दोनसाठी १० हजार १२९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात ९ झोनल अधिकारी ६१ सहाय्यक परिरक्षक व ६१ केंद्र संचालक यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील झोनल ऑफिसर व सहाय्यक परिरक्षक यांच्या नियुक्ती सोडत पद्धतीने जबाबदाऱ्या  सोपविण्यात आल्या असून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय दक्षतेने काम करताना प्रश्नपत्रिका, परीक्षाविषयक सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर केल्या. तर परीक्षेदरम्यान,पर्यवेक्षक सर्वेक्षक व परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात मोबाईल बंदी करण्याच्या सूचना उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे यांनी केल्या. शिक्षक पात्रता परीक्षेचे  जिल्हा परिरक्षक उपशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण व विस्ताराधिकारी चंद्रकांत  गवळी परीक्षेशी संबंधित गोपनीय साहित्य, परीक्षेपूर्वी परीक्षेच्या दिवशी व परीक्षा झाल्यानंतर केद्र्र संचालक यांनी करावयाची कामे व जबाबदाºया कर्तव्य याबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग मुख्यालयातील विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी प्रास्ताविक केले. निलेश पाटोळे यांनी आभार मानले.  

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकexamपरीक्षा