नाशिक : नाशिकमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानकपणे काहीकाळ हवामान ढगाळ होऊन शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. नाशिकरोड परिसरात तर रिमझिम पाऊसदेखील पडला. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांसह प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत भर घातली आहे. नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसला तरी अशा दूषित वातावरणात कोणतेही विषाणू पसरण्याचा तसेच ज्येष्ठांना आणि बालकांना सर्दी होण्याचे शक्यता अधिक असल्याने नागरिक अधिकच धास्तावले. शहराच्या काही भागांत अल्पसा शिडकावा होऊन गेल्याने तापलेल्या जमिनीतील उष्णतादेखील बाहेर पडली. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हानंतर सायंकाळी हवेत गारवा पसरला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी अधिकाधिक वेळ घरातच थांबून आरोग्य जपावे.
ढगाळ हवामानासह पावसाचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:17 IST
नाशिकमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानकपणे काहीकाळ हवामान ढगाळ होऊन शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. नाशिकरोड परिसरात तर रिमझिम पाऊसदेखील पडला. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांसह प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत भर घातली आहे.
ढगाळ हवामानासह पावसाचा शिडकावा
ठळक मुद्देनागरिक चिंतित : गार हवेने दिलासा