नाशिक : येथील रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून दोनदिवसीय मोफत सर्वरोग निदान शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टिळकपथ येथील रेडक्रॉस सोसायटीच्या इमारतीमधील शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे २६० रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. छातीविकारतज्ज्ञ डॉ. सुषमा दुगड, डॉ. गौरी कुलकर्णी यांनी व्हायटलोमीटरने रुग्णांच्या फुफ्फुस क्षमतेची चाचणी केली. शिबिरातील सुमारे ५५ रुग्णांना अधिक तपासणी व उपचारासाठी डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सदर शिबिरात सोनोग्राफी, एक्सरे, स्टेस टेस्ट, टूडी इको, रक्त-लघवी तपासणी मोफत करण्यात आल्या असून, शिबिर उद्याही सुरू राहणार आहे. यावेळी रेडक्रॉसचे मेजर पी. एम. भगत, डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. सुनील औंधकर, सचिन देसले, प्रमोद मोरे, प्रवीण कोतकर आदि उपस्थित होते.
रेडक्रॉसच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: May 21, 2014 00:23 IST