शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळात गोंधळ! प्रवाशांचे लगेज सेाडून स्पाईस जेट नाशिकहून दिल्लीत, प्रवाशांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 23:33 IST

Spice Jet : नाशिककरांना स्पाईस जेटने मेाठा धक्का दिला. आज दुपारी पाऊण वाजता निघणारे  विमान तब्बल दीड दोन तास विलंबाने झेपावले. मात्र, दिल्लीत गेल्यानंतर विमानातून प्रवाशांचे लगेच न आणता त्यांना बेेल्टवर पाठविण्यात आले.

नाशिक  - नाशिककरांना स्पाईस जेटने मेाठा धक्का दिला. आज दुपारी पाऊण वाजता निघणारे  विमान तब्बल दीड दोन तास विलंबाने झेपावले. मात्र,दिल्लीत गेल्यानंतर विमानातून प्रवाशांचे लगेच न आणता त्यांना बेेल्टवर पाठविण्यात आले. नंतर सामान आलेच नसून ते स्वतंत्र विमानाने पाठविण्यातयेणार असल्याचे आणि बुधवारी (दि. २६) मध्यरात्री सामान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने आणखीनच गोंधळ उडाला. रात्री पोलिसांकड तक्रार करण्यात आल्यानंतर एअरपोर्टवर गोंधळ निस्तरण्याचे प्रयत्न झाले. तर दुसरीकडे कंपनीने प्रवाशांना दीड हजार रुपयांची नाममात्र मदत राहण्या-खाण्यासाठी दिली.

ओझर विमानतळावरून दुपारी १२:४५ वाजता स्पाईस जेटचे विमान झेपावणार होते. मात्र, दुपारी सव्वा दोन वाजता ते झेपावले. या विमानात १६६ प्रवासी होते. मात्र, विमान स्पाईस जेटचे नव्हते तर कोरंडेन एअरलाईनचे हायर केलेले विमान होते. मुळातच ते विलंबाने निघाले आणि दिल्लीत साडेतीन वाजतापोहोचल्यानंतर लगेजसाठी आठ क्रमांकाच्या बेल्टवर जाण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रवासी तेथे गेले, मात्र लगेज येत नव्हते. चौकशीअंतीप्रवाशांचे लगेज या विमानाने आलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार सांगण्यात आल्याने प्रवाशी सर्द झाले.मध्यरात्री हे सामान पोहचेल तोपर्यंत जेप्रवासी जेथे जात असतील तेथे त्यांना जाता येईल तेथे असतील त्या ठिकाणी त्यांना सामान पोहोचविण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रवासीरात्री उशिरापर्यंत तयार नव्हते.

टॅग्स :airplaneविमानNashikनाशिक