शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

उन्हाळ्याच्या सुट्टीत धावणार विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:38 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातर्फे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १०० विशेष रेल्वे धावणार आहेत.

नाशिकरोड : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातर्फे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १०० विशेष रेल्वे धावणार आहेत.भुसावळ-मुंबई, पुणे-गोरखपूर, बनारसजवळील मंडुडीदरम्यान उन्हाळी सुट्टी निमीत्त विशेष रेल्वे गाडया धावणार असून विशेष गाड्या विशेष शुल्कावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोरखपुर सुपरफास्ट रेल्वे १२ एप्रिल ते ५ जुलै पर्यत दर सोमवारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता गोरखपुरला पोहचेल. तसेच गाडी क्रमांक ०२०१० सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वे १३ एप्रिल ते ६ जुलै पर्यत दर शनिवारी गोरखपुर येथून दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल. या रेल्वेला दादर, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावल, बºहाणपूर इटारसी, भोपाल, झांसी, उरई, कानपुर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा व बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस जवळील मंडुडीह साप्ताहिक विशेष रेल्वे (गाडी नंबर ०१०२५) १७ एप्रिल ते ३ जुलैपर्यंत प्रत्येक बुधवारी रात्री ००. ४५ वाजता सुटून दुसºया दिवशी पहाटे ४.४५ वाजता मंडडीहला पोहचेल. तर मंडुडीह येथून (गाडी नंबर ०१०२६) १८ एप्रिल ते ४ जुलै पर्यंत दर गुरूवारी सकाळी ६.३० वाजता निघून दुसºया दिवशी सकाळी ७.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पहोचेल. ही रेल्वे कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहबाद एवं ज्ञानपुर थाबेल.पुणे येथून (गाडी नंबर ०१४७५) साप्ताहिक विशेष रेल्वे ७ एप्रिल ते ३० जून पर्यंत प्रत्येक रविवारी सायंकाळी ५.५५ वाजता सुटून तिसºया दिवशी पहाटे ४.३० गोरखपुरला पोहचेल. गोरखपूर येथून (गाडी नंबर ०१४७६) ९ एप्रिल ते २ जुलै पर्यंत प्रत्येक मंगळवारी सकाळी ७.२५ सुटून तिसºया दिवशी सायंकाळी ५.०० वाजता पुण्याला पोहचेल. या रेल्वेला दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, झांसी, उरई, कानपुर, बाराबंकी, गोंडा, बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे.पुणे-मंडुडीह साप्ताहिक विशेष (गाडी क्रमांक ०१४९७) ११ एप्रिल ते २७ जून २०१९ पर्यंत प्रत्येक गुरूवारी रात्री ९.३० वाजता सुटून तिसºया दिवशी पहाटे ३.२५ वाजता मंडुडीह येथे पोहचेल. मंडुडीह येथून (गाडी क्रमांक ०१४९८) १३ एप्रिल ते २९ जून २०१९ पर्यंत शनिवार पहाटे ४.४५ वाजता सुटून तिसºया दिवशी दुपारी १२ वाजता पुण्याला पोहचेल. सदर गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहाबाद, ज्ञानपुर येथे थांबा देण्यात आलेला आहे.आरक्षणाची सुविधाछत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस व पुणे येथून सुटणाºया उन्हाळ्याच्या सुट्टीतील विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह सर्व रेल्वे आरक्षण कार्यालय व आयआरसीटीसी वेबसाईट उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील विशेष रेल्वे गाड्यातील काही रेल्वेंना आरक्षण लागु करण्यात आलेले नसून त्यांचे तिकीट सामान्य तिकीट खिडकीवरून देण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcentral railwayमध्य रेल्वे