ंमहाराष्टच्या उद्योग विकासासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:41 AM2018-03-20T01:41:00+5:302018-03-20T01:41:00+5:30

महाराष्ट्रातील उद्योग व्यापार वाढावा यासाठी केंद्रात असलेले सर्व मंत्री एकत्रितरीत्या प्रयत्न करतील अशी ग्वाही देशाचे वाणिज्य व नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.

Special efforts by the Central Government for the development of the industry | ंमहाराष्टच्या उद्योग विकासासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न

ंमहाराष्टच्या उद्योग विकासासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न

Next

नाशिक : महाराष्ट्रातील उद्योग व्यापार वाढावा यासाठी केंद्रात असलेले सर्व मंत्री एकत्रितरीत्या प्रयत्न करतील अशी ग्वाही देशाचे वाणिज्य व नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.  राज्यातील व्यापार, उद्योग, शेती व सेवा अशा विविध विषयांवर चर्चा करण्याच्या दृष्टीने महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने महाराष्टतून दिल्लीत गेलेले केंद्रीयमंत्री, खासदार आणि दिल्ली स्थित वरिष्ठ अधिकारी यांचे संमेलन नुकतेच पार पडले. यावेळी प्रभू यांनी ही ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार संजय राऊत, रामदास तडस, ए. टी. पाटील धनंजय महाडिक, चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्टÑाचा औद्योगिक विकास करण्यासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन देतानाच अशाप्रकारचा स्नेहमेळावा घेण्याच्या परंपरेचे त्यांनी कौतुक केले. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक क्षेत्रात योगदान देणार चेंबरचे संस्थापक वालचंद शेठ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयंती किंवा स्मृती दिनी स्टार्टअप दिन साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. यावेळी रामदास आठवले तसेच कोल्हापूरचे खासदार धनंजय मंडलिक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात खासदार हुसेन दलवाई, विनय सहस्त्रबुद्धे, चंद्रकांत खैरे, उद्योग सचिव अपूर्व चंद्रा तसेच चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Special efforts by the Central Government for the development of the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.