शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहांच्या वक्तव्याने युतीत दरी विस्तारली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:39 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला असून, स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला असून, स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले, तर गुजराती भाजपामध्ये सेनेला उचलून पटकण्याचा दम नसल्याची खोचक प्रतिक्रिया शिवसेनेने व्यक्त केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत नाशिक जिल्ह्णातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, लागून असलेल्या धुळे मतदारसंघातूनही भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपाकडे दोन, तर सेनेकडे एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याविषयी अनिश्चितता आहे. सेनेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असला तरी, भाजपा मात्र अजूनही युतीच्या आशेवर असतानाच लातूर येथे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सेनेला डिवचणारे वक्तव्य केल्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उचलून पटकण्याची भाषा भाजपाने केल्यामुळे सेनेनेही तितकेच उसळून प्रतिक्रिया दिली असून, गुजराती भाजपामध्ये सेनेला उचलून टाकण्याचे दम नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना घराघरात पोहोचली असून, पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी यापूर्वीच युती होणार नसल्याचे जाहीर केलेले असताना उचलून टाकण्याइतका दम असलेल्या भाजपाने युतीसाठी सेनेला गळ घालण्याचे कारण काय? असा सवालही केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपानेदेखील स्वबळावर लढण्याइतपत ताकद जिल्ह्णातील तीनही मतदारसंघात निर्माण केली असून, शिवसेनेने युती केली, तर त्यांचाच फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.शिवसैनिक महाराष्टतील मातीत कुस्ती लढणारा असून, गुजरातींमध्ये त्यांना पटकण्याची ताकद नाही. अयोध्या, पंढरपूर येथे शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला आमची ताकद दिसेल. अमित शाह यांना पक्षाध्यक्ष ठाकरे प्रत्युत्तर देतील.  - सुनील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुखभारतीय जनता पक्षाने तीनही लोकसभा मतदारसंघात तयारी पूर्ण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. शिवसेना युती करणार असेल, तर भाजपाच्या ताकदीचा त्यांना फायदाच होईल. अन्यथा भाजपा स्वबळावर लढण्यास तयार आहे. तशा सूचना पक्ष कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत.  - दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNashikनाशिक