शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्टपतींच्या पाच हेलिपॅडसाठी जागेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:15 IST

नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिका-यांनी तळ ...

ठळक मुद्देमांगीतुंगी सोहळा : लष्कर, शासकीय यंत्रणेची धावपळ

नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिका-यांनी तळ ठोकला आहे.दोन वर्षांपूर्वी मांगीतुंगी पर्वतावर अखंड दगडावर जैन धर्मीयांचे आद्य भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट मूर्तीचे निर्माण करण्यात येऊन महामस्ताभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. जैन साध्वी ज्ञानमती माताजी यांनी येत्या २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्टपतींना निमंत्रण देण्यात आले व त्यांनी या संमेलनासाठी येण्याची तयारी दर्शविल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. ओझर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरने राष्टपती मांगीतुंगी येथे जाणार असल्याचा दौरा असला तरी, मांगीतुंगी येथे पाच हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी १२ एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्रींसह अन्य मंत्रीही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनासाठी वाहनतळासाठी दोन ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. गेल्या आठवड्यात लष्कराच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मांगीतुंगी येथे जाऊन पाहणी केली तसेच राज्याच्या मुख्य सचिवांनीही भेट देऊन व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक