शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांदगिरी भागात सोयाबीन बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:22 IST

एकलहरे : सोयाबीन हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून सर्वपरिचित आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसते. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसते. तालुक्याच्या पूर्व भागात दि. १५ जून ते दि. १५ जुलै दरम्यान सोयाबीनची पेरणी केली असल्याने तण खुरपणीत शेतकरी व्यस्त आहेत.

ठळक मुद्देपावसाची हजेरी : तण खुरपणीत शेतकरी व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : सोयाबीन हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून सर्वपरिचित आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसते. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसते. तालुक्याच्या पूर्व भागात दि. १५ जून ते दि. १५ जुलै दरम्यान सोयाबीनची पेरणी केली असल्याने तण खुरपणीत शेतकरी व्यस्त आहेत.विशेषत: जाखोरी, चांदगिरी परिसरात खरीप हंगामाच्या सुरु वातीलाच पेरणी झाली असल्याने व बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने महिनाभराचे वाढलेले सोयाबीनचे पीक डौलाने बहरलेले दिसते. या सोयाबीन पिकातील तणाची खुरपणी करण्याचे काम सद्या शेतकरी करताना दिसतात.पेरणीनंतर सुरु वातीचे ६ ते ७ आठवडे हे तणवाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरु वातीला पीक तणविरहित ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी २० ते ३० दिवसांनी एक कोळपणी व ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी केली जाते. गरजेनुसार एक दोन खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावे लागते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकांमुळेही चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणाचा बंदोबस्त करता येतो, त्यामुळे पीक जोमदार येते असे शेतकऱ्यांनी सांगितले.वेळोवेळी कोळपणी करण्याची गरजकोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतले जाते. काही ठिकाणी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. तूर, कपाशी, भुईमूग, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेता येते. पेरणीनंतर सुरु वातीला पिकाच्या वाढीसाठी तणविरहित ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी वेळोवेळी कोळपणी करण्याची गरज असते.आंतरपिकातील सोयाबीनसारखे नगदी पीक शेतकºयांच्या आर्थिक अडचणी दूर करू शकते. जनावरांसाठी व कुक्कुट पालनासाठी सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.- रणजित आंधळे,सहायक कृषी अधिकारी, जाखोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती