शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

येवला तालुक्यात सोयाबीन, मका पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 2:33 PM

देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अनेक संकटाचा सामना करत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरु ण शेतकरी वर्ग तर आता शेतीच कसायला नको म्हणतो आहे.

देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अनेक संकटाचा सामना करत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरु ण शेतकरी वर्ग तर आता शेतीच कसायला नको म्हणतो आहे. दिवस-रात्र शेतात कष्ट करून ही कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाने शेती व्यवसाय शेकऱ्यांसाठी आता जीवघेणा ठरत आहे. परिसरात अल्पपावसाच्या ओलीवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर सुमारे एक महिना पावसाने ओढ दिली. ऐन बहरात असताना सोयाबीन, बाजरी व मका ही पिके सुकून उत्पादन घटले. शेतकऱ्यांना खरिपात फायदेशीर असलेल्या मका पिकावर यावेळी लष्करी अळीचे संकट ओढवले. पीक वाचिवण्यासाठी औषध फवारणीचा शेतकर्यास प्रति एकर दहा हजार रूपये अतिरिक्त खर्च करावा लागला. सोयाबीन व बाजरी पिकांचे देखील उत्पादन घटले. कांदा पीक तर वारंवार रोपे बदलत्या हवामानामुळे कुजल्याने अनेक शेतकºयांना अद्याप कांदा लागवड करता आली नाही. मोचक्याच शेतकर्यांकडे ती देखील अल्पप्रमानात कांदा लागवड झाली. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर संपूर्ण पिकच गेल्याने पूर्णत: उध्वस्त झाला आहे. एकूणच परतीच्या पावसाने मोठ्या कष्टाने उभा केलेला खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातातून हिसकवला असून शेती अन शेतकºयांचे दिवाळे काढले आहे. मुख्य पीक असलेल्या कांदा पिकाचे रोप चौथ्यांदा टाकण्याची वेळ आली आहे. पण आता स्वत:जवळील बियाणे देखील संपल्याने अन सिड्स बियाणे विकत घेण्यासाठी पैसाही नाही, अशा विचित्र विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक