शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसुल उपबाजार येथे सोयाबीन, मका व भुसारधान्य लिलाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:34 IST

अंदरसुल : येथील बाजार समिती उपबाजार येथील कॉटन मार्केट मध्ये हंगाम सन 2020-21 करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य खरेदीचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सौ. उषाताई शिंदे व भुजबळ संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे यांचे हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्दे 30 वाहनातून सोयाबीन व मका विक्रीस आला होता.

अंदरसुल : येथील बाजार समिती उपबाजार येथील कॉटन मार्केट मध्ये हंगाम सन 2020-21 करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य खरेदीचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती  उषाताई शिंदे व बाळासाहेब लोखंडे यांचे हस्ते करण्यात आला.             उपबाजार आवारावर ट्रॅक्टर व पिकअप असे एकुण 30 वाहनातून सोयाबीन व मका विक्रीस आला होता. सर्वप्रथम शेतकरी गोकुळ निवृत्ती सोनवणे यांचा टोपी व उपरणे देवून सत्कार करण्यात आला. सोनवणे यांनी ट्रॅक्टर या वाहनातुन आणलेल्या मकास रु. 1311/- प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.सोयाबीनचे बाजारभाव किमान रु. 4151/- ते कमाल रु. 4201/- तर सरासरी रु. 4153/- पर्यंत होते. तर मकाचे बाजारभाव किमान रु. 1024/- ते कमाल रु. 1311/- तर सरासरी रु. 1200/- प्रतिक्विंटल पर्यंत होते.येथील उपबाजार आवारावर मका व भुसाराान्य लिलाव सुरु झाल्यामुळे अंदरसुल परिसरातील शेतकर्‍यांची जवळच्या ठिकाणी मका व भुसारधान्य विक्रीची चांगली सोय झाली आहे. तसेच शेतीमालाचे रोख पेमेंट मिळणार असुन शिवार व खेडा खरेदीतुन होणारी वजनातील फसवणुक टाळली जाणार आहे.

उपबाजार अंदरसुल येथे आठवडातुन सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे पाच दिवस लिलाव चालु राहणार असल्याने अंदरसुल परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका, सोयाबीन व इतर भुसारधान्य उपबाजारात वाळवुन व स्वच्छ करुन विक्रीस आणावे तसेच चांगले बाजारभाव मिळणेसाठी आपला शेतीमाल बाजार समिती मयेच विक्री करावा असे आवाहन बाजार समिती सभापती सौ. उषाताई शिंदे, उपसभापती गणपतराव कांदळकर, अंदरसुल उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, सचिव के. आर. व्यापारे व संचालक मंडळाने केले आहे.           कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, नंदकिशोर आट्टल, गोरख सुराशे, मनिषा जगताप, दिपक जगताप, कैलास जगताप, भाऊसाहेब गायकवाड, गजानन देशमुख, कांदा व्यापारी भिकाशेठ एंडाईत, विलास गाडे, सुभाष आट्टल, सुनिल आट्टल, अभिजीत काले, रामनाथआप्पा लिंगायत, शिवाजी ढोले, निवृत्ती ढोले, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर माळी, लक्ष्मण वडाळकर, अरुण जेजुरकर, संजय ढोले, तुळशीदास सोनवणे, संतोष दाभाडे, अरुण सोनी, गौरव दिघे, राहुल दायमा, ज्ञानेश्वर भागवत आदींसह शेतकरी, बाजार समिती कर्मचारी, माथाडी उपस्थित होते. 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड