माळमाथ्यावर दुबार पेरणीचे संकटदसाणे : माळमाथा परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पिके हातातून गेल्याने बळीराजासमोर पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.जून महिन्यात मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी बी-बियाणे शेतात टाकले. कर्जाची रक्कम घेऊन शेतकऱ्यांनी महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. पेरणी केलेले बियाणे उगवले, परंतु पावसाने दडी मारली. आता पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पीक जळून खाक झाले. पाऊस पडत नाही म्हणून शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले. जनावरांना चारा शिल्लक नसल्याने दुधाळ जनावरे उपाशीपोटी आहेत. जनावरांना बाजारात कोणी विकत घेत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बी-बियाणे द्यावे, जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
माळमाथ्यावर दुबार पेरणीचे संकट
By admin | Updated: July 28, 2015 00:42 IST