शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोपे नसल्याने थेट कांदा बियाणांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:52 IST

शेतकऱ्यांनी शोधला उपाय : कमी वेळात कमी मशागतीत प्रयोग

ठळक मुद्देसध्या शेतकऱ्यांच्या लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग कांदा लागवडीकडे वळला आहे.

जळगाव नेऊर : परतीच्या पावसामुळे जमिनीतच सडलेली कांद्याची रोपे, वाढत्या बाजारभावामुळे रोपांना आलेला सोन्याचा भाव, बाजारात लागवडीसाठी रोपांची वाढती टंचाई यामुळे शेतकऱ्यांनी आता त्यावर उपाय शोधत पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा लागवड न करता थेट कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे. कमी वेळात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत असली तरी शेतकऱ्यांनी सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी झाला तर हजारो रु पयांची खर्चाची बचत होणार आहे.सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च टाळून थेट कांदा लागवड होत असल्याने तालुक्यातील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणीचा प्रयोग करत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग कांदा लागवडीकडे वळला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कांदा रोपे वाया गेली. तर लाल कांदा अतिपाण्यामुळे सडला. परिणामी हातात येणारे पिक वाया गेले. पुन्हा नव्याने कांदा रोप तयार करावयाचे झाल्यास त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे . त्यानंतर कांदा लागवड होईल. सदर कांदा ऐन उन्हाळ्यात काढणीस येईल. त्यातही त्यावेळच्या कडक उन्हामुळे कांदा जमिनीत येतो कि नाही याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा पेरणीचा प्रयोग चालविला आहे. कांदा लागवडीसाठी येणारा एकरी सुमारे ८ हजार रु पये खर्च याबरोबरच सारे पाडणे, वाफे बांधणे यासाठी लागणा-या वेगळ्या खर्चाची बचत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा