शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:37 IST

१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

ठळक मुद्देबळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे : अपुऱ्या सिंचन सुविधांचा परिणाम, पीककर्ज मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गोसे धरणाची निर्मिती झाली असली तरी जिल्ह्याचा बहुतांश भाग आजही कोरडवाहू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेतकºयांचे अर्थकारण चालते. योग्यवेळी मान्सूनचा पाऊस झाल्यास पीकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खरीप हंगामातील उत्पन्न चांगले झाल्यास शेतकºयांची वर्षभराची चिंता मिटते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आला आहे.जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या दुग्धव्यवसायावर देखील परिणाम होत असून दूध उत्पादन निम्म्यावर आले आहे.शेतकºयाच्या समस्यांत वाढ होत असून याकडे शासन स्तरावरुन विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.पिक कर्जासाठी शासन कितीही गाजावाजा करत असले तरीही ग्रामीण भागातील बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतकºयांना बँकाचे उंबरठे झीजवावे लागत आहे. गावोगावी तलाठ्यांनी मुख्यालयी पाठ फिरविल्याने शेतकºयांना योग्य वेळेत कागदपत्र मिळत नाहीत.खरीप हंगामात देखील तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून महसुल व बँक कर्मचाऱ्यांना सुचना देवून शेतकºयांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची मुख्यालयांकडे पाठअनेक ठिकाणी खरीप हंगामात देखील तलाठी,कृषी सहाय्यक उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.शेतकºयांना सात बारा,आठ अ,पिकपेरा ही कागदपत्रे बँकेत सादर केल्याशिवाय पिककर्ज मंजूर होत नाही.परंतु शासकीय कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना पिककर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत.दरवर्षीच्या कमी पावसाने शेतकºयांचे उत्पन्न घटले आहे. यावर्षी तरी वेळेत पाऊस झाल्यास चांगल्या पीकपाण्याची अपेक्षा होती. परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने अजूनही बी-बियाणे, खतांची खरेदी केलेली नाही.-दीपक गिºहेपुंजे,शेतकरी, खरबी नाका