नाशिक : यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून घेतला गेला आहे. त्यामुळे राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या ‘नाशिक ढोल’चा आवाज यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत घुमणार नाही.सुरुवातीला नाशिक ढोल म्हणून राज्यभरात ‘बडे भाई’ ढोलवाले यांच्या ढोलवादनाने प्रसिद्धी मिळविली. गणेशोत्सवात त्यांचा ढोल सर्वत्र वाजत होता. कालांतराने येथील तरुणही ढोल वादनाच्या छंदाकडे वळल्याने नाशिकलाही पुण्याच्या धर्तीवर विविध प्रकारचे ढोल पथके स्थापन झाली. या पथकांची संख्या सुमारे २५ ते ३० झाली असून यामध्ये तरुण, तरुणींचा सहभाग आहे. कमरेला ढोल-ताशा बांधून ही तरुण वादक मंडळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वादनाचा सराव नियमितपणे करत असतात. मात्र या वर्षी शहरात कुठल्याही भागांमधून सरावाचा आवाज कानी पडत नाही. कोरोनामुळे यंदा सर्वच ढोल पथकांनी सराव थांबविला आहे.>गणेशोत्सवाचा निधी कोविडसाठीरत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली बारा वर्षे सुरू असलेला गणेशोत्सवच रद्द करण्याचा निर्णय रत्नागिरीतील श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळाने घेतला आहे.मंडळाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गणेशोत्सव रद्द करण्याची घोषणा महिनाभरापूर्वीच केली आहे. दरवर्षी उत्सवानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रमांसाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च करण्यात येतात.मात्र, यावर्षी हा निधी कोविडसाठी खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० दशावतार व नमन मंडळांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. नाशिकच्या बडेभाई ढोलवाले गुलाबखान यांनीही यंदाकुठूनही ‘सुपारी’ मिळालेली नसल्याचे सांगितले.
यंदा ‘नाशिक ढोल’चा आवाज घुमणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 02:53 IST