शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

झाडाझडती होताच मनपा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:44 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले असताना प्रशासन मात्र अपेक्षेनुरूप ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही. यासंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, शनिवारी (दि.१३) सकाळी तातडीने बैठक बेालावली असून, आता शहरात सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे संकेत मिळाले आहेत.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले असताना प्रशासन मात्र अपेक्षेनुरूप ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही. यासंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, शनिवारी (दि.१३) सकाळी तातडीने बैठक बेालावली असून, आता शहरात सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे संकेत मिळाले आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक बोलावली असून, त्यास सर्व खातेप्रमुखांनी हजर राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्य सचिवांनी विभागीय स्तरावर दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक घेताना नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. किमान ३० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगशहरातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना एका बाधिताशी संबंधित किमान तीस जणांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, प्रतिबंधित क्षेत्रांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत शनिवारी (दि.१३) होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर दिसत नाही. तसेच काॅन्ट्रॅक्ट टेसिंग अपेक्षेनुसार होत नाही. प्रतिबंधित क्षेत्रदेखील मर्यादित आहेत, या सर्व विषयांना मुख्य सचिवांनी हात घातला असल्याने त्याच विषयावर आयुक्त कैलास जाधव खातेप्रमुखांशी चर्चा करणार आहेत.  शहरात ६ एप्रिल राेजी कोराेनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीला नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती. नंतर मात्र मुंबई, पुण्यासह बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे संसर्गही वाढत गेला. जूननंतर नाशिकमध्ये तर कोरोनाचा कहर झाला होता. परंतु नोव्हेंबरनंतर रुग्णसंख्या कमी झाली तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील घटले. त्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली असून, दिवसाला पाचशेपेक्षा अधिक रुग्ण तर केवळ नाशिक शहरातच आढळत आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा नियंत्रण आणले जात असले तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या