सून सरपंच, तर सासूबाई उपसरपंचनिमगाव-देवपूर : राजकीय सामंजस्याचे अनोखे उदाहरणशैलेश कर्पे ल्ल सिन्नरसिन्नर तालुक्यातील्य निमगाव-देवपूर येथे सासू-सुनेच्या राजकीय सामंजस्याचे अनोखे उदाहरण पहायला मिळाले आहे. सरपंचपदी सून अर्चना भागवत मुरडनर, तर उपसरपंचपदी सासू सीताबाई सखाराम मुरडनर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन ९ सदस्यांची बिनविरोध निवड केली. सरपंचपद इतर मागासवर्ग महिलेसाठी राखीव होते. सरपंच व उपसरपंच निवडणुकीत सरपंचपदासाठी अर्चना मुरडनर, तर उपसरपंचपदासाठी सीताबाई मुरडनर यांचे प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे सूनबाईची सरपंचपदी तर सासुबाईची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. सरपंच-उपसरपंच निवडीच्या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र मुरडनर, रामनाथ पवार, सचिन मुरडनर, शांताराम काळे, सुमन मुरडनर, भारती माळी, कुंदा जगताप उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच सून-सासूचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अलका मुरडनर, विकास संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मुरडनर, विष्णू थोरात, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सोपान मुरडनर, साहेबराव मुरडनर, केरू मुरडनर, ज्ञानदेव जगताप, कैलास मुरडनर, सर्जेराव मुरडनर आदिंसह ग्रामस्थ उपस्थि होते. (वार्ताहर)ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव होते. सासूबाई सरपंच व्हाव्यात, अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र त्यांना जातीचा दाखला नसल्याने अडचण आली. त्यामुळे मला सरपंच होण्याचा आग्रह झाला. एकोपा व समजूतदारपणामुळे ज्याप्रमाणे आमच्या घराची प्रगती झाली, तसाच गावाचा विकास करू. - अर्चना मुरडनर, सरपंच, निमगाव-देवपूर
सून सरपंच, तर सासूबाई उपसरपंच
By admin | Updated: September 1, 2015 23:02 IST