शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

राज्यातील सत्ता जाताच भाजपच्या सदस्यत्वाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:16 IST

राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या सदस्य संख्येलाही ओहोटी लागली असून, नवीन सभासद करताना कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांना दि. २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक शहर आणि जिल्हाध्यक्षपदासाठी निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देरचना रखडली : संघटनात्मक निवडणुकांसाठी २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक : राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या सदस्य संख्येलाही ओहोटी लागली असून, नवीन सभासद करताना कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांना दि. २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक शहर आणि जिल्हाध्यक्षपदासाठी निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे.जळगाव येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आल्याचे स्थानिक भाजपच्या सूत्रांनी सांगितले. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सभासद नोंदणी मोहीम वाजत गाजत राबविण्यात आली. मिस कॉल दिल्यानंतरदेखील सभासद करून घेण्यात येत होते. त्यामुळे देशभरात भाजपचे विक्रमी सदस्य नोंदविले गेले होते. केवळ नाशिकचाच विचार केला तर शहरात पावणेपाच लाख सदस्य नोंदविले गेल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्यक्ष नोंदणी झाल्यानंतर मिस कॉलद्वारे नोंदलेल्या सभासदांची पडताळणी केल्यानंतर ४ लाख ८५ हजार सदस्य नोंदवले गेले होते. यंदा त्यात ३० टक्केवाढीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी सभासद वाढीसाठी प्रदेश पातळीवरूनच होणारा पाठपुरावा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसते आहे. स्थानिक पातळीवर प्राथमिक सभासद झाल्यानंतर सक्रिय सदस्य होण्यासाठी एकास पंचवीस याप्रमाणे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र तेच अद्याप पूर्ण झाले नसल्याने बुथ प्रमुखांच्या निवडणुका रखडल्या आहेत. शहरातील बुथ प्रमुुखांच्या ८० टक्के नियुक्त्या झाल्यानंतरच मंडल प्रमुखांच्या निवडणुका घेता येतात. परंतु बुथवर पदाधिकारी म्हणून नियुक्त होण्यासाठी सक्रिय सदस्य होणे आवश्यक असते. अशा कार्यकर्त्यांची पंचवीस पंचवीस सदस्य नोंदविण्यासाठी दमछाक होत असल्याचे वृत्त आहे.जळगाव येथे नुकत्यात झालेल्या प्रदेशाच्या बैठकीत नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात बुथनिहाय निवडणुकांसाठी दि. २५ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत बुथप्रमुखांच्या ८० टक्के निवडीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाईल.जिल्हाध्यक्ष निवडीला मुदतवाढनाशिकसह राज्यातील सर्वच शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडप्रक्रिया आधी दि. १० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, नंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली. तीदेखील संपली आणि आता पुन्हा दि. २५ डिसेंबरपर्यंत मंडल स्तरापर्यंतच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा