शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुग्णालयांत होणार सोनोग्राफीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:46 IST

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना विशेषत: प्रसूतीसाठी महिला येत असताना अवघ्या दोनच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशीन आहेत.

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना विशेषत: प्रसूतीसाठी महिला येत असताना अवघ्या दोनच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशीन आहेत. त्यामुळे आणखी दोन मशीन घेऊन ते मोरवाडी आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.  महापालिकेच्या आरोग्य समितीची बैठक सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २८) पार पडली. यावेळी याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड आणि डॉ. राजेंद्र भंडार यांनी ही माहिती दिली.सिडकोतील मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गेलेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी अन्यत्र पाठविल्याची तक्रार होती. त्या पार्श्वभूमीवर कुलकर्णी तसेच अन्य सदस्यांनी प्रशासनाला विचारणा केली. यावेळी महापालिकेच्या बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय येथेच सोनोग्राफीची व्यवस्था आहे. त्यामुळे अन्य रुग्णालयातील रुग्णांना शासकीय रुग्णालय किंवा बिटको रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जातो.बिटकोत एक रेडिओलॉजिस्ट आहे, तर इंदिरा गांधी रुग्णालयात आॅनकॉल डॉक्टरच हे काम बघतात. सिडकोतील महिलेलादेखील याच कारणामुळे सोनोग्राफी बाहेरून करून आणण्याचा सल्ला देण्यात आला होता. महापालिका आता आणखी दोन सोनोग्राफी मशीन घेण्यात येणार आहे. ते श्री स्वामी समर्थ रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मशीन उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, महापालिकेच्या सफाई कामगारांतील काही कामगारांच्या व्यसनाधिनतेच्या पार्श्वभूमीवर या कामगारांसाठी व्यसनमुक्ती शिबिर आयोजित करण्याचा प्रस्ताव सभापती सतीश कुलकर्णी यांनी मांडला होता. तोदेखील मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात लवकरच मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्या माध्यमातून शिबिर चालविण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. राहुल गायकवाड यांनी सांगितले.स्वच्छतेच्या अहवालाबाबत विचारला जाबमहापलिकेच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दर आठवड्याला केलेला कारवाईचा अहवाल आरोग्य समितीला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र दोन ते तीन विभागीय कार्यालयाकडूनच अहवाल प्राप्त असून, त्यावरदेखील सभापतींनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल