शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोनपावलांनी आज गौरींचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:13 IST

नाशिक : गणरायापाठोपाठ शनिवारी (दि. १५) सोनपावलांनी महालक्ष्मींचे आगमन होत आहे. गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही स्वागत तितक्याच मंगलमय वातावरणात, उत्साहाने करण्यास नाशिककर सज्ज झाले आहे. घरोघरी रात्री उशिरापर्यंत गौरींच्या देखाव्याची सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला मग्न असल्याचे दिसून आले.पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हटले जाते. महालक्ष्मींचा हा ...

नाशिक : गणरायापाठोपाठ शनिवारी (दि. १५) सोनपावलांनी महालक्ष्मींचे आगमन होत आहे. गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही स्वागत तितक्याच मंगलमय वातावरणात, उत्साहाने करण्यास नाशिककर सज्ज झाले आहे. घरोघरी रात्री उशिरापर्यंत गौरींच्या देखाव्याची सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला मग्न असल्याचे दिसून आले.पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हटले जाते. महालक्ष्मींचा हा सण तीन दिवस घरोघरी साजरा होणार आहे.पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसºया दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन होईल. काहींच्या घरी फोटोतल्या, मुखवट्याच्या, उभ्या, सुगडाच्या, खड्याच्या तर काहींच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मी असतात. प्रथेप्रमाणे त्यांची स्थापना, पूजन व विसर्जन केले जाते.गौरींच्या सजावटीसाठी बाजारात वैविध्यपूर्ण साहित्य दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत महिलांनी दागिने, साड्या, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, फळे, फुले आदींच्या खरेदीवर भर दिला. गौरींच्या पूजनासाठी सोळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जात असल्याने बाजारात या भाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असताना तिसºया दिवशी गौरींचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम