शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोनसाखळी चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:11 IST

शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे.

नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. चोरट्यांकडून एकूण आठ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.महिनाभरापासून शहरात सोनसाखळी चोरीसारख्या जबरी लुटीच्या घटना वाढल्या होत्या. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत वडाळारोडवर नासर्डीपुलालगत एका पादचाºयाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली होती. या घटनेत फिर्यादीने मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याप्रकरणी गुन्हे शोध पथकाला तातडीने फिर्यादीने संशयितांचे वर्णन सांगितले. त्यानुसार रात्रगस्तीवर असलेले गुन्हे शोधपथकाचे हवालदार मधुकर घुगे, दीपक वाघ, भाऊसाहेब नागरे यांनी मुंबईनाका, शिवाजीवाडी, गोविंदनगर या भागात संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी एक अल्पवयीन संशयित घुगे यांच्या हाती लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने सराईत गुन्हेगार योगेश दामू कडाळे (२१), कैलास हरी भांगरे (१८), अंकुश सुरेश निकाळजे (१९) या तिघांची नावे सांगितली.यांच्या मदतीने परिसरात लूटमारीचे गुन्हे करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. अल्पवयीन गुन्हेगारावरही यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच योगेश हा सराईत गुन्हेगार असून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर सोनसाखळी चोरीसारखे नऊ गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत योगेश हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हे करत होता. चेहरा झाकलेला व दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने फिर्यादी महिलांना त्याचे वर्णन सांगणे अवघड होत होते; त्यामुळे योगेश पोलिसांना चकवा देत गुन्हेगारी करत होता. त्याची ‘खाकी’च्या शैलीत चौकशी केली असता तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लंपास केलेल्या मुद्देमालापैकी ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल धारधार चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी