शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

सोमेश्वरला दूषित पाण्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:47 IST

सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे.

गंगापूर : सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे. शहर व परिसरातील भाविक व पर्यटक, नागरिकांचे दूषित पाण्याच्या दुर्गंधीने आरोग्य धोक्यात आले आहे. गोदापात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या नाल्यांच्या दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापात्रात सोडले जात असल्याने गोदावरी प्रदूषणमुक्त कशी होणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गंगापूररोडवरील श्रीक्षेत्र सोमेश्वर दररोज भाविक दर्शनासाठी येत असून, सुटीच्या दिवशी या ठिकाणी भाविकांच्या बरोबर पर्यटकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. याठिकाणी येणारे भाविक व पर्यटक गोदापात्रालगत असलेल्या श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिराच्या निसर्गरम्य परिसराचा विलोभनीय आनंद लुटतात. असे असताना या मंदिरालगत असलेल्या नाल्याचे पाणी थेट गोदापात्रात वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरवण्याबरोबरच साथीच्या रागांनाही आमंत्रण दिले जातात. याकडे मनपा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळेझाक केल्याचे दिसून येत असून, भाविक व पर्यटकांमध्ये नाराजी पसरते आहे. दरम्यान, संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या नाल्याच्या पाण्याचा बंदोबस्त करावा व गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यास हातभार लावावा, अशी मागणी भाविक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे. श्रीक्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आमच्यासारखे कितीतरी लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, परंतु परिसरात दुर्गंधी पसरल्याने आमच्यासारखे भाविक नाराज होऊन, चुकीचा संदेश भाविकांमध्ये जातो. मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण असले पाहिजे, सुगंध दरवळला पाहिजे. - मोहन दीक्षित, भाविकमंदिर परिसरातील उघड्या नाल्यामुळे दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा सांगून झाले मात्र संबंधित विभाग लक्ष देत नसल्यामुळेच भाविकांमध्ये नाराजी आहे. मंदिर विश्वस्थांच्या मिटिंगमध्ये याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.- बाळासाहेब लांबे, विश्वस्थ, सोमेश्वर मंदिर

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका