शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांकडून तलाठ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:56 IST

लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : तलाठी व कोतवालांचे कामबंद आंदोलन

नाशिक : लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे.गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अंबादास रामदास पूरकर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेले असता दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली. मारहाणीत पूरकर हे जागीच बेशुद्ध पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त कळताच जिल्ह्यातील तलाठ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात वाळूमाफियांची तस्करी व दादागिरी वाढली आहे. गेल्या महिन्यात तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्यावरही सामनगाव रस्त्यावर वाळूमाफियांनी लोखंडी टॉमी उगारण्याचा प्रयत्न केला होता. तहसीलदारांकडून वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांवर दबाव टाकला जातो. मारहाण करणाºयांविरुद्ध मोक्कान्वये कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.तक्रारीची दखल नाहीविशेष म्हणजे तलाठी पूरकर यांनी यापूर्वी वाळूमाफियांविरुद्ध कारवाई केल्यामुळे त्यांना अधूनमधून धमक्या येत होत्या. देवळा तहसीलदारांनी पूरकर यांची भरारी पथकात नेमणूक केल्याने पूरकर यांनी पाच दिवसांपूर्वीच येत असलेल्या धमक्यांची लेखी तक्रार तहसीलदारांकडे केली होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही व भरारी पथकाला पोलीस बंदोबस्तही देण्यात आलेला नाही. त्यामुळे सदरची घटना घडल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक