शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

शिपाई झाले लिपिक, आरोग्यसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:00 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वर्ग ‘ड’च्या परिचरांना ‘क’ वर्गात पदोन्नती देण्यात आली असून, त्यामुळे एकेकाळी शिपाईपदावर काम करणारे कर्मचारी ...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत पदोन्नती : कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वर्ग ‘ड’च्या परिचरांना ‘क’ वर्गात पदोन्नती देण्यात आली असून, त्यामुळे एकेकाळी शिपाईपदावर काम करणारे कर्मचारी आता लिपिक, आरोग्यसेवक, वाहनचालक म्हणून काम करणार आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्तकेला जात आहे. दरम्यान, परिचरांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे लवकरच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेत २००५ मध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या परिचरांना त्यांच्या सेवा कालावधीचा विचार करता कालबद्ध पदोन्नती देणे आवश्यक होते. परंतु अनेक वर्षांपासून हा विषय प्रशासकीय पातळीवरच प्रलंबित ठेवण्यात आला होता. मध्यंतरी प्रशासनाने सर्व कर्मचाºयांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार करून त्यांना दहा, वीस व तीस वर्षे अशा कालावधीतील वेतनश्रेणीचा लाभ दिल्यानंतर कर्मचाºयांच्या जिव्हाळ्याचा असलेला पदोन्नतीचा विषय हाती घेण्यात आला.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी या संदर्भात अधिकाºयांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनुकंपातत्त्वावरील १२ परिचरांना वर्ग ‘क’मध्ये पदोन्नती देण्यात आली. त्याचबरोबर पाच वरिष्ठ सहायक लिपिकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.नियमित परिचर म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत दाखल झालेल्या दहा कर्मचाºयांना वाहनचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. चार कनिष्ठ लेखाधिकाºयांना सहायक लेखाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांचे प्रश्न निकाली काढण्यात आले असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, वित्त व लेखाधिकारी महेश बच्छाव यांनी याकामी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर परिचरांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे परिचरांची पदे रिक्त झाली असून, लवकरच ही पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद