शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी सोडियम हायपोक्लोरॉइड फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 14:52 IST

कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देदिलीप बोरसे : स्वखर्चाने राबविली मोहीम

सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातलेला आहे. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकारने २४ मार्चपासून देशात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बोरसे यांनी आजपासून सटाणा शहरासह नामपूर ,जायखेडा येथे स्वखर्चाने सोडियम हायपोक्लोरॉईड या औषधाची फवारणी सुरू केली आहे. गावागावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांनीही या मोहिमेचे स्वागत करीत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. मोहिमेचा शुभारंभ करतांना आमदार बोरसे म्हणाले, प्रत्येक नागरिकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त शक्यतो घराबाहेर पडू नये, बाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रु माल बांधावा, समोरच्या व्यक्तीशी बोलताना लांब अंतरावरून बोलावे, घरात कोमट पाणी प्यावे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास त्वरित संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.या औषध फवारणी मोहिमेत आमदार बोरसे यांच्यासमवेत तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, , जिल्हा परिषद माजी सदस्य पप्पू बच्छाव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष साहेबराव सोनवणे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, नगरसेवक काकाजी सोनवणे, विकी सोनवणे, योगेश सूर्यवंशी, भाजपा युवती तालुकाध्यक्ष रूपाली पंडित, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाकळे, शहराध्यक्ष ज्योती ठाकरे, नगरसेविका सुवर्णा देवरे यांच्यासह शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य