शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

संस्था संघटनांनी जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:39 IST

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली.

नाशिक : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली. नाशिकमधील सुमारे १५० गोरगरिबांपर्यंत हे डबे स्वयंसेवक लीना पंजाबी यांच्यासह धनश्री कुलकर्णी, हेमल लदानी, प्रियंका बांगर, पंकज जोशी, पराग चौधरी, विकास ठाकरे आदींनी विविध भागांत पोहचविली.युनिक ग्रुपयुनिक ग्रुपच्या वतीने आदिवासी पाड्यावर स्वच्छतेचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. ग्रुपच्या वतीने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते. यंदाही ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या चिंचुतारा या आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील नागरिकांना यावर्षी स्वच्छतेचा संदेश देत कपडे, खाऊ, बिस्किटे, पेन आदी साहित्याचे वाटप ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महेश सौंदाणे, वसंत चिकोडे, सुधाकर गायधनी, अनुप बागड, किशोर शिरसाठ, कैलास देवांग, अनिल जाचक, गुलाब गविल, दिगंबर काळे, ग्रामस्थ उपस्थित होते.पाच शहरांमध्ये उपक्रम‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम नाशिकसह मिर्झापूर, गुरूग्राम, अहमदाबाद, भोपाळ व बंगळुरू या शहरांमध्येही राबविण्यात आला. एकूण एक लाख रुपयांच्या भेटवस्तू समाजातील श्रमिक घटकांपर्यंत पोहचविण्यात आल्याचा दावा मंचाकडून करण्यात आला आहे. तसेच नाशिकमधील मातोश्री वृद्धाश्रम येथे दिवे व आकाशकंदील भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे या मंचच्या लांबा कुटुंबीयांनी उद्यान बाके दिली.रिमांड होम येथे फराळ वाटपनाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने रिमांड होम येथे दोन लाडू एक करंजी हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी गं. पां. माने, डॉ. हेमलता पाटील, मनपा सभापती वैशाली भोसले, अविनाश आहेर, पां. भा. करंजकर, अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. श्याम दुसाने तर सूत्रसंचलन सूर्यकांत आहेर यांनी केले. चंद्रकांत बोंबले यांनी आभार मानले. पाहुण्यांचा सत्कार रेखा शेलार व छाया बिडलॉन, मीना चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवक