शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी सोसायट्या आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:38 IST

नाशिक : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यात यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या आग्रही झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एकत्र येत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यात यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या आग्रही झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एकत्र येत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.यासंदर्भात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या फेडरेशनची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा बॅँकेमार्फत शेतकºयांना कर्जपुरवठा करणाºया विविध कार्यकारी सोसायट्यादेखील जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या चार वर्षांपासून अडचणीत आल्या होत्या. आता मात्र शासनाने दोन लाख रुपये पीककर्ज थकबाकीदार असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली व त्याचा लाभ जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना मिळाला आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक रकमेचे थकबाकीदार असलेल्या व नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज दिले जात नाही. याबाबत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांना निवेदन देण्यात आले असून, शेतकºयांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिल्यास सोसायट्यांना जीवदान तर मिळेलच; परंतु कोरोनाच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकºयांना उभे राहण्यास मोठी मदत होणार असल्याचे म्हटले आहे. जिल्हा बॅँकेने लवकरात लवकर कर्जपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा फेडरेशनच्या वतीने शेतकºयांसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फेडरेशनचे नेते विष्णुपंत गायखे, राजू देसले, भाऊसाहेब गायकवाड, संजय गायधनी, संपतराव वक्ते, मनोहर देवरे, सोमनाथ गायकवाड यांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक