शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण समिती : देयके थांबविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:58 IST

नाशिक : समाजकल्याण खात्याच्या वतीने दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या रकमेत प्रत्येक ठिकाणी तफावत असून, काही ठिकाणी दीड लाख रुपये, तर काही ठिकाणी पाच लाखांपर्यंत खर्च करण्यात येत असल्याने या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी व खर्चातील तफावत दूर होईपर्यंत या संदर्भातील देयके अदा करू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ यांनी दिल्या.

ठळक मुद्देदलित वस्तीतील ‘हायमास्ट’ची जिल्हा परिषद करणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : समाजकल्याण खात्याच्या वतीने दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या रकमेत प्रत्येक ठिकाणी तफावत असून, काही ठिकाणी दीड लाख रुपये, तर काही ठिकाणी पाच लाखांपर्यंत खर्च करण्यात येत असल्याने या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी व खर्चातील तफावत दूर होईपर्यंत या संदर्भातील देयके अदा करू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ यांनी दिल्या.मंगळवारी समाजकल्याण सभापती मेंगाळ यांनी आॅनलाइन मासिक सभा घेतली. त्यात सदस्य सुरेश कमानकर यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून दलितवस्ती लख्ख दिव्यांनी उजळून काढण्यासाठी हायमास्ट बसविण्याची योजना सुरू करण्यात आली असून, ग्रामपंचायतींमार्फत या कामांचे ठेके दिले जातात.मात्र काही गावांमध्ये पाच लाख, तर काही ठिकाणी दीड, दोन लाख रुपयांत हायमास्ट बसविले जात आहेत. हायमास्ट बसविण्याबाबत जे मानांकन ठरवून दिले आहे, त्याचा विचार केला तर खर्चात तफावत का? असा प्रश्न उपस्थित करून अनेक दलित वस्तीतील हायमास्ट बंद पडून शोभेचे दिवे बनल्याचेसांगितले.त्यावर जिल्ह्णात अशाप्रकारे किती हायमास्ट बसविण्यात आले याची माहिती गोळा करून सध्या सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्याचे तसेच दर तफावतीचीही चौकशी करण्यात यावी तोपर्यंत देयके अदा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत आंतरजातीय विवाह योजनेचा आढावा घेण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस राजेंद्र भगरे, प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र परदेशी व समाजकल्याण निरीक्षक उपस्थित होते.तांत्रिक दोषामुळे सभा गुंडाळलीसमाजकल्याण समितीची सभा आॅनलाइन घेण्यात आली. मात्र त्यात अनेक तांत्रिक दोष असल्याने अनेक सदस्य या सभेसाठी जोडले जाऊ शकले नाहीत. सभेच्या वेळेनंतर पंधरा मिनिटांनी तांत्रिक दोष दूर करण्यात आला असला तरी, आवाज व स्पष्टता नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक खटाटोपी करूनही तांत्रिक दोष दूर न होऊ शकल्याने अखेर सभा गुंडाळावी लागली व पुन्हा आठ दिवसांनी सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद