शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाच्या प्रचारात सामाजिक संस्थाच पडतात कमी: सुनील देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:24 IST

नाशिक : अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअंधश्रध्देचा पगडा अधिकअपुऱ्या माहितीमुळे प्रतिसाद कमी

नाशिक: अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.गेल्या काही वर्षांपासून अवयवदान जनजागृतीसाठी ते महाराष्ट्रात पदयात्रा करत आहेत. यातून आजवर १४५ गावांमध्ये ३५० च्या वर कार्यक्रम घेतले  अवयवदानाच्या प्रचारासाठी महाराष्टÑात पदयात्रा करणारे देशपांडे हे रविवारपासून (दि.५) पुन्हा पदयात्रा सुरू करीत आहेत. त्या संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- अवयवदान हा शब्द सध्या सुपरिचीत होत आहे. मात्र, त्यानंतरही आवश्यकतेनुसार प्रमाण वाढत नाही, त्यामागची नेमकी कारणे कोणती?देशपांडे- आपण विकसनशील देश असलो तरी अवयवदानात अत्यंत मागे आहोत. त्याची अनेक कारणे अहेत. अंधश्रध्दा, अपुरी माहिती यामुळे प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक यासंदर्भात देशपातळीवर जागृती झाली पाहिजे, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. आपल्याकडे अवयवदानाचे पुरेसे महत्व माहिती नाही, हीच खरी अडचण आहे.

प्रश्न- अवयवदान वाढविण्यासाठी नेमके काय प्रयत्न व्हावेत..देशपांडे- अवयवदानाविषयी आपल्याकडे पुरेशी जागृती नाही नेत्र व त्वचा हे बाह्य अवयव दान करू शकतो. नैसर्गिक मृत्यू आला तर माणसांचे ३ मिनीटात अवयव निकामी होतात. मात्र त्वचा व नेत्र हे सहा तासाच्या आत दान करु शकतो. तसेच देहदान केल्यास याचा फायदा वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत असतो. १० विद्यार्थ्यांमागे १ देह असणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम डॉक्टर तयार होण्यास मदत होते. तसेच कुणाला अवयव दान केल्यास मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तिलाही यामुळे जीवनदान मिळू शकते. हे लोकांना कळले तर पुढिल कामे सोपे होतात. लोकांचा धर्मावर मोठा विश्वास असल्याने त्यांना धार्मिक पद्धतीने समजावून सांगणे महत्वाचे असते. मी करीत असलेल्या पदयात्रा साठीच आहेत. त्यातून काही तरी चांगले बाहेर पडेल अशी अपेक्षा ठेवू या!

मुलाखत- अमोल निरगुडे

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवकOrgan donationअवयव दान