शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:28 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ३३ झाली आहे.

नाशिक : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत.गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकयांची संख्या ३३ झाली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यांसारख्या संकटांनी पिचलेल्या शेतकºयांमध्ये नैराश्य वाढीस लागत असून, खरीपपूर्व मशागतीची वेळ तोंडावर आली असताना शेतकºयांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळत नसल्याने ते स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.  दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी पद्माकर कारभारी आवारे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तर सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (६८) या शेतकºयाचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीमध्ये आढळून आला.  नांदगाव तालुक्यातही चांदोरा येथील एका शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे वृत्त असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.  याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी ते ६ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.सन्मान यात्रेची घोषणाविशेष म्हणजे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी व आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकीकडे शेतकरी सन्मान यात्रेची नाशिक शहरातून घोषणा केली असताना याच कालावधीत जिल्ह्णात जवळपास पाच शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या क्लेषदायक घटना पुढे आल्या आहेत. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या