शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोराच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:23 IST

घोटी : इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील घाटनदेवी शिवारात जिल्हाबंदी चौकशी सुरू असताना नाकाबंदीमध्ये तपासात २ इसम विनानंबर प्लेटची गाडी घेऊन जात असताना हटकले असता, ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या ताब्यात येताच त्याच चोरट्यांनी तपासात विविध चोरींची कबुली दिली.

ठळक मुद्देसहा गुन्ह्यांची उकल : इगतपुरीसह ठाणे जिल्ह्यातील प्रकार

घोटी : इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील घाटनदेवी शिवारात जिल्हाबंदी चौकशी सुरू असताना नाकाबंदीमध्ये तपासात २ इसम विनानंबर प्लेटची गाडी घेऊन जात असताना हटकले असता, ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या ताब्यात येताच त्याच चोरट्यांनी तपासात विविध चोरींची कबुली दिली.इगतपुरी पोलीस ठाण्यात २ दुचाकी चोरीच्या तक्रारी आल्या असता त्याचा शोध सुरू होता. चोरट्यांनी एका गुन्ह्यापाठोपाठ इगतपुरी व मुरबाड येथून सहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.जिल्हाबंदी तपासणीदरम्यान घाटनदेवी येथे नाकाबंदीच्या वेळी नंबरप्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन जात असताना दोन इसम आढळले. मोटारसायकल आरोपी मयूर विसे, महेश खापरे, रा. मुरबाड यांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तपासात चोरट्यांनी ६ मोटारसायकली इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथून चोरी केल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून आणखी वाहन चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता असून, पुढील तपास सहायक उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, दीपक पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र गांगुर्डे, मुकेश महिरे करीत आहेत.चोरट्यांनी इगतपुरी शहरातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भागातून अशा विविध ठिकाणांहून दुचाकी गाड्या चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याचा धागा पकडून तपासाची गती वाढवीत मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्याने ही टोळी उजेडात आली. या टोळीकडून आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.- समाधान नागरे, पोलीस निरीक्षक, इगतपुरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे