शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

लष्करी अळीमुळे दमछाक

By संजय डुंबले | Published: August 04, 2019 1:15 AM

बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मका पिकाला पसंती दिली जात असते. यावर्षी मात्र लष्करी अळीने शेतकºयांची दमछाक केली असून, त्यांन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याबरोबरच कीटकनाशकांचा खपही वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड ; फवारणी पंपांना वाढली मागणी

नाशिक : बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मका पिकाला पसंती दिली जात असते. यावर्षी मात्र लष्करी अळीने शेतकºयांची दमछाक केली असून, त्यांन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याबरोबरच कीटकनाशकांचा खपही वाढला आहे.कमी उत्पादन खर्च आणि भरघोस उत्पन्न यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी खरीप हंगामात मका पिकाला पसंती देऊ लागले आहेत. मक्याकडे कल वाढल्याने बाजरीचे क्षेत्र घटले आहे. घरी खाण्यापुरती बाजरी करून अनेक शेतकरी मक्याला पसंती देतात. विशेषत: येवला, निफाड, चांदवड, नांदगाव, कळवण आदी तालुक्यांंमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अनेक शेतकरी मक्यातून रब्बी हंगामासाठी भांडवल उभे करीत असतात. मक्याला उत्पादन खर्चही कमी लागत असल्याने सर्वसामान्य शेतकºयांच्या दृष्टीने सर्वात सोपे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. यावर्षी मात्र मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. लष्करी अळीने एक दोन नव्हे तर तालुक्यातील सर्वच क्षेत्रावर आक्रमण केले असल्याने अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांमध्येच चढाओढ लागली आहे. यामुळे भाडेतत्त्वावर फवारणी करून देणाºयांकडे शेतकºयांचे नंबर लागले आहेत. आपला नंबर केव्हा येईल याची तासा तासाने शेतकरी या व्यावसायिकांकडे विचारणा करीत आहेत. सर्वांची मागणी पूर्ण करताना व्यावसायिकांनाही तारेवरची कसरत करावी लागत असून, मोठ्या क्षेत्रावर फवारणी करताना त्यांचीही दमछाक होत आहे.फवारणी करणाºया व्यावसायिकांकडे लागलेले नंबर, त्यांचे वाढलेले दर आणि एका औषध फवारणीत अळीवर कोणताही परिणाम होत नसल्याने अनेक शेतकºयांनी स्वत:च नवीन फवारणी पंप विकत घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून कृषी विक्रेत्यांकडे फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पूर्वी पाठीवर बांधता येणारे साधे फवारणी पंप मिळत असत आता यातही आधुनिकता आली असून, सध्या बाजारात बॅटरीवर आणि पेट्रोलवर चालणारे व एसटीपी फवारणी पंप उपलब्ध झाले आहेत. सध्या शेतकºयांकडून बॅटरीवर चालणाºया कृषी पंपांना अधिक पसंती दिली जात आहे.बॅटरीच्या पंपाची बॅटरी एकदा चार्ज केली की साधारणत: २०० ते २५० लिटर औषधाची फवारणी होते. तर पेट्रोल पंपाला एक लिटरमध्ये १५० ते २०० लिटर औषधाची फवारणी होते. साधा फवारणी पंप १००० ते १५००, बॅटरीवरील पंप १८०० ते २५००, पेट्रोलवरील ३५०० ते ३८०० आणि एसटीपी पंप ५००० ते ७००० रुपये या दराने विकले जात आहेत.एकादा फवारणी केल्यानंतर लष्करी अळीचा नायनाट होत नाही. किमान दोन तीन फवारण्या शेतकºयांना कराव्या लागत आहेत. दरवेळी भाडेतत्त्वावर पंप आणणे परवडणारे नसल्याने शेतकºयांनी स्वत:चा पंप घेण्यास अधिक पसंती दिली आहे. या खर्चा व्यतिरीक्त कीटक नाशकांसाठीही शेतकºयांना खर्च करावा लागत आहे. एक एकरावरील मकाच्या एक वेळच्या फवारणीसाठी किमान १२०० ते १५०० रुपयांची किटकनाशके खरेदी करावी लागतात.एक वेळच्या फवारणीने अळीवर कोणताही परीणाम होत नाही. काही शेतकºयांनी आताच तीन ते चार फवारण्या केल्या आहेत. यामुळे लष्करी अळीने शेतकºयांचे हाल तर विक्रेत्यांना मालामाल केल्याची चर्चा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होतआहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती