शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:46 IST

शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात आली आहे. याच धर्तीवर शहरभर स्मार्ट पार्किंग साकारण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेतर्फे पहिलाच प्रयोग निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ वाहनतळ हा शहराचा कळीचा प्रश्न

नाशिक : शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात आली आहे. याच धर्तीवर शहरभर स्मार्ट पार्किंग साकारण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे.  शहरात वाहनांची संख्या वाढत चालली असली तरी पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहने लावावी कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. शहरात अत्यंत मर्यादीत स्वरूपात महापालिकेने पे अ‍ॅँड पार्कची सुविधा दिली आहे. उर्वरित ठिकाणी वाहनतळ नसल्याने कोठेही वाहन उभे केले तर वाहन उचलून नेले जाते आणि वाहतूक पोलीस दंडही आकारतात. त्यापार्श्वभूमीवर वाहनतळ हा शहराचा कळीचा प्रश्न बनला आहे. वाहनतळांसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर इतस्तत: उभ्या केल्या जाणाºया वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन, शहरवासीयांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात निवड झाल्यानंतर पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी एनएमएससीडीसी लि. कंपनीतर्फे शहरात ४१ ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारले जाणार आहे.  यामध्ये ३४ ठिकाणी रस्त्यांच्या कडेला, तर सात ठिकाणी खुल्या मैदानात स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारली जाणार आहे. त्यातून वाहनतळांच्या जागेचा शोध व डिजिटल पेमेंटला चालना देण्याबरोबरच शहरातील पार्किंगच्या मालमत्तेत सुधारणा करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे सांगण्यात आले. पार्किंगची जागा शोधणे होणार सोपे या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचे पार्किंग सेन्सर, डॅश बोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे स्मार्ट पार्किंगच्या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहे. अत्याधुनिक सुधारणांनी प्रस्तावित ही स्मार्ट पार्किंगची सुविधा कॅशलेस असणार आहे. मोबाइल अ‍ॅपचा वापर करून वाहनचालकांना पार्किंगची जागा शोधणे सहजसोपे होणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtraffic policeवाहतूक पोलीस