शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : मोठी बातमी! नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार?; सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग
2
"काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार"
3
ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं!
4
एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय
5
शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’; निकालानंतर जितेंद्र आव्हाड भेटीला, घातले साष्टांग दंडवत
6
Video - दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल
7
"आम्ही बांगलादेशींमुळे हरलो"; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली
8
निकालानंतर भाजपनं स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं? NDAच्या बैठकीत या दोन पक्षांना नाही बोलावलं!
9
Ixigo IPO: ट्रॅव्हल कंपनी इक्झिगोचा १० जूनला IPO येणार; किती असेल प्राईज बॅन्ड, जाणून घ्या
10
T20 WC 24 : पाकिस्तानी संघाने चाहत्यांकडून केली वसूली; खेळाडूंना भेटण्यासाठी घेतली मोठी रक्कम
11
लोकसभा निवडणूक निकाल २०२४: सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले Top 5 उमेदवार
12
"कृपा करून आम्हाला जगायला...", लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग
13
शरद पवार नाही, नितीशकुमार-चंद्राबाबुंना सोबत आणण्यासाठी युपीतील बड्या नेत्यावर जबाबदारी? दिल्लीला रवाना
14
भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना
15
खलिस्तानवादी अमृपालसिंगपासून ते सांगलीच्या विशाल पाटलांपर्यंत; हे आहेत निवडून आलेले ७ अपक्ष खासदार
16
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही"; मनोज जरांगेंचा इशारा
17
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचीही उडी, कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना दिली उमेदवारी
18
TATA Group Company : टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपणार! महत्त्वाच्या प्लानला मिळाली मंजुरी
19
निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार!
20
ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...

स्मार्ट पार्किंगचे प्रात्यक्षिक महापालिका : ३३ ठिकाणी पार्र्किंगचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:08 AM

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देमोबाइल अ‍ॅपचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आलेवाहनासाठी जागा शिल्लक आहे किंवा नाही याचीही माहिती मिळणार

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील पार्किंग सुरू करण्यापूर्वी त्याची चाचणी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी (दि.६) घेण्यात आली. यावेळी बुम अ‍ॅरिअरसह पार्किंगचे दर, वाहनांसाठी मोकळी जागा याबाबतची माहिती डिजिटल डिस्प्लेद्वारे देण्यात आली तसेच मोबाइल अ‍ॅपचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महापालिका क्षेत्रात वाहनतळाचा विषय गंभीर असून, या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात ३३ ठिकाणी पार्किंग होणार आहे. आॅन स्ट्रिट पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे, तर आॅफ स्ट्रिट पार्किंगमध्ये निश्चित ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा आहे. याठिकाणी वाहनतळ डिजिटल केले जाणार असून, त्यांची जोडणी एका अ‍ॅपद्वारे मोबाइलशी केली जाणार आहे. त्याद्वारे वाहनधारक ज्या रस्त्यावर वाहने लावू इच्छितात, त्यांना जवळील महापालिकेचे वाहनतळ कोणते, तेथे पार्किंगचे दर काय आहेत, वाहनासाठी जागा शिल्लक आहे किंवा नाही याचीही माहिती मिळणार आहे. बारकोड पद्धतीचे तिकीट, अवघ्या तीस सेकंदात पार्किंगमधून बाहेर पडण्याची सोय याची चाचणी यावेळी करण्यात आली. त्यासाठी राजीव गांधी भवनातील पार्किंग, रामायण बंगल्यालगतचे वाहनतळ आदी ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.