शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टसिटीचे आढेवेढे, उत्पन्नवाढीसाठी मनपाचे पाऊल पडते पुढे...!

By suyog.joshi | Updated: October 31, 2023 13:18 IST

महानगरपालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच साठ जागांवर मोबाईल टॉवर लावले जाणार असून त्यातून पालिकेला वर्षाकाठी पाच ते सहा कोटींचा महसूल मिळ्णार आहे.

नाशिक : शहरात स्मार्ट सिटीकडून सतरा ठिकाणी पार्किंग सुरू करण्यासाठी प्रयत्न होते. मात्र मध्येच स्मार्ट सिटीने हा विषय सोडून दिला. महापालिका प्रशासन आता ज्या सतरा जागा आहेत. त्याची माहिती घेऊन पार्किंग सुरू करण्यासाठी चाचपणी करणार आहेत. या जागांसह पालिकेच्या मोकळ्या जागा असून त्यांचाही विचार केला जाणार आहे.

महानगरपालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत.. नुकत्याच साठ जागांवर मोबाईल टॉवर लावले जाणार असून त्यातून पालिकेला वर्षाकाठी पाच ते सहा कोटींचा महसूल मिळ्णार आहे. यानंतर आता महापालिकेकडून पे ॲण्ड पार्किंग सुरू करणार असून याकरिता शहरातील सतरा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून त्या मक्तेदाराला चालवण्यास दिल्या जाणार असून यातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. करसंकलन व बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून व केंद्राकडून जीएसटी परताव्याची रक्कम येते. मात्र यातील निम्मा खर्च अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. उर्वरित रकमेतून दैनंदिन कामे व विकासकामासाठी ही रक्कम खर्चित होते. दरम्यान, विविध विकासासाठी निधी हवा असेल तर उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याच्या सक्त सूचना पंधराव्या वित्त आयोगाने दिल्या आहेत. यानंतर पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोतवाढीचे पर्याय शोधण्याचे काम सुरू केले आहे. त्यातूनच शहरात साठ ठिकाणी मोबाइल टॉवरसाठी जागा शोधल्या आहेत. यानंतर पालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकत शहरात पालिकेच्या मोकळ्या जागा पडून आहेत. तेथे पे ॲण्ड पार्किंग सुरू करून त्यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न आहेत.वाहनांची संख्या वाढणारशहरात पार्किंगची समस्या नवीन नाही. वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने मुख्य रस्त्यांवर वाहने लावली जातात. शहरात चार वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अशा वेळी वाहनांची संख्या वाढणार आहे. त्या दृष्टीने ही वाहनतळे महत्त्वाची ठरणार आहेत. प्रारंभी स्मार्ट सिटीने ही वाहनतळ उभारण्याची तयारी दर्शविली, मात्र पुढे हा विषय बारगळला. परंतु पालिकेने उत्पन्नवाढीसाठी पे ॲण्ड पार्किंगसाठी हालचाली सुरू केल्याने यातून वाहतूक कोंडीच्या समस्येतून वाहनधारकांची सुटका होण्याची शक्यता आहे.महापालिकेकडून करवसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मोबाइल टॉवरमधून पालिकेला महसूल मिळणार आहे. उत्पन्नवाढीसाठी जे शक्य आहे ते पर्याय आहे. शहरात पालिका आपल्या जागेवर पे ॲण्ड पार्किंग सुरु करणार आहे. येत्या काही दिवसांत याबाबत कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.-प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा

टॅग्स :Nashikनाशिक